मी माघार घेतलेली नाही, मी प्रभाग क्रमांक 12 मधून काँग्रेसचा अधिकृत उमेदवार ...
मी माघार घेतलेली नाही, प्रभाग क्रमांक 12 मधून काँग्रेसचा अधिकृत उमेदवार - इब्राहीम पटेल
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.3(डि-24 न्यूज) - प्रभाग क्रमांक 12 मधून सर्वसाधारण जागेतून मी काँग्रेसचा अधिकृत उमेदवार आहे. विरोधक मी माघार घेवून वंचितला पाठिंबा दिला अशी अफवा सोशल मिडियावर पसरवत आहेत. मतदारांना माझे आवाहन आहे प्रभाग क्रमांक 12 मध्ये क्रमांक 1 वर माझी निशाणी पंजा आहे.
मी या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 11 मधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. प्रभाग क्रमांक 12 मधून सर्वसाधारण जागेतून काँग्रेसची उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. प्रभाग 11 मधून अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतला व त्या प्रभागातील वंचितचे उमेदवार अयुब खान यांना पाठींबा दिला आहे. प्रभाग क्रमांक 12 मध्ये काँग्रेसच्या अधिकृत पॅनलची पहिली प्रचार फेरी पूर्ण झाली आहे. मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याने विरोधकांची धडकी भरल्याने मी महापालिका निवडणुकीतून माघार घेतली असल्याची अफवा पसरवली जात आहे. अफवा पसरवणा-यांविरोधात सायबर क्राईम मध्ये तक्रार दाखल करणार असल्याची माहिती डि-24 न्यूजला काँग्रेसचे उमेदवार इब्राहीम पटेल यांनी दिली आहे.
What's Your Reaction?