शहर काँग्रेस यादीमध्ये घोळाचा वाद थंड होत नाही तर अनुसूचित जाती विभागाच्या नियुक्तीवरून वाद, उद्या आंदोलन
शहर काँग्रेस यादीमध्ये घोळाचा वाद थंड होत नाही तर अनुसूचित जाती विभागाच्या नियुक्तीवरून वाद, उद्या आंदोलन
औरंगाबाद, दि.3(डि-24 न्यूज) शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पदाधिकारी यादी बदलण्यात आली व काही नावे वगळून नवीन नावे यादीत समाविष्ट करुन निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलल्याचा आरोप झाला होता त्यानंतर अंतर्गत वाद विकोपाला गेला होता. ज्यांना पदे देण्यात आली ते कधी गांधीभवनकडे फिरकले नाहीत तर कधी आंदोलनात सहभाग घेतला नाही व त्यांना माहीत सुध्दा नाही की त्यांना पद मिळाले हा वाद संपण्याच्या अगोदर काँग्रेस अनुसूचित जाती विभागात वादाची ठिणगी पडली आहे. अनुसूचित जाती विभागाचे सक्रीय शहराध्यक्ष अरुण सिरसाट यांचे अचानक पद काढून अलंकृत येवतेकर यांची नियुक्ती केल्याने पदाधिकारी यांचे राजीनामे सत्र सुरू झाले आहे. येवतेकर यांना शहराध्यक्ष पदी नियुक्ती करताना सिरसाट यांना विश्वासात घेतले नाही व येवतेकर हे सक्रीय नसताना शहराध्यक्ष पद देण्यात आले असा आरोप केला जात आहे.
अनुसूचित जाती सेलचे प्रदेशाध्यक्ष सिध्दार्थ हत्तीअंबीरे यांनी सिरसाट यांची फेरनियुक्ती करावी अशी मागणी कालच सचिवपदी निवड करण्यात आली रवी लोखंडे यांनी केली होती त्यांनी यामुळे आपल्या सचिव पदाचा राजीनामा दिला आहे.
प्रा.शिलवंत गोपनारायण , सोशल मीडिया प्रमुख, शहर जिल्हाध्यक्ष यांनी तर उद्या गांधीभवनसमोर निदर्शने करण्यासाठी परवानगी मागितली आहे.
डॉ.मिलिंद आठवले, प्रवक्ते, उत्तम दनके, ब्लॉक अध्यक्ष, यादव अहिरे, ब्लॉक सचिव, सुनील साळवे, ब्लॉक अध्यक्ष, सचिन लोखंडे, पूर्व विधानसभा उपाध्यक्ष, युवक काँग्रेस, प्रशांत पगारे, सचिव, प्रमोद मुळे, किशोर सरोदे, प्रा.अनिल पांडे यांनी राजीनामा सादर केला आहे. डॉ.पवन डोंगरे यांची अध्यक्षपदी, सोशल मीडिया, नियुक्ती करण्यात आली आहे.
What's Your Reaction?