इज्राईलच्या उत्पादन खरेदीसाठी BOYCOTT, शहरात झळकले बॅनर, कोट्यावधींचे नुकसान
इज्राईलच्या उत्पादन खरेदीसाठी BOYCOTT, शहरात झळकले बॅनर
औरंगाबाद, दि.3(डि-24 न्यूज) इज्राईव व हमास युद्ध मागील 20 ते 22 दिवसांपासून सुरू आहे. या युध्दात पॅलेस्टिनी नागरिक दहा हजारांपर्यंत मुले, महीला व नागरीकांचा या हल्ल्यात मृत्युमुखी पडले आहे. तर इज्राईलचे 3 हजार पर्यंत लोकांचा जीव गेला आहे. दोन्ही देशांचे सैनिक सुध्दा या युध्दात मारले जात आहे. अशी माहिती सुत्रांकडून मिळत आहे. हे युध्द थांबले पाहिजे नाहक नागरीकांचा जीव जायला नको असे सर्वांना वाटते आहे. भारतात सुध्दा हे युध्द थांबले पाहिजे अशी मागणी केली जात आहे. मोठ्या प्रमाणात भारतात इज्राईलच्या उत्पादनाची विक्री केली जाते यामध्ये शीतपेये म्हणजे पेप्सी कोकोकोलाचा समावेश आहे. इज्राईलने तयार केलेल्या वस्तूंचा वापर करु नये व खरेदी विक्री करु नये, औरंगाबाद शहरात या वस्तूंचा BOYCOTT करण्यासाठी मोहीम तीव्र झाली आहे. शहरात अशा प्रकारचे बॅनर लावले आहेत. युध्दविराम व्हावे व निष्पापापांचा मुले महीलांचा यामध्ये जाव गमवावा लागत आहे यामुळे देशभर विशेष दुवाचे आयोजन करण्यात येत आहे. शहरातील आमखास मैदानावर गेल्या शनिवारी इज्राईलचा निषेध करण्यासाठी व हमासच्या सुरक्षेसाठी दुवा करण्यात आली आहे. इज्राईलच्या उत्पादनाचा BOYCOTT झाल्याने कोट्यावधी रुपयांचे नुकसान होत आहे याचा परिणाम इज्राईलच्या अर्थव्यवस्थेवर होताना दिसत आहे.
या वस्तूंच्या विक्रीवर झाला परिणाम....
शीतपेये, नेस्ले, पिजा, पफ, पेप्सी, पामोलिव्ह, लविज, ली, जाॅन्सन साबन, पावडर, सिएनएन, जाॅकी, ओरल-B, एमवे, लोरियल, पि एण्ड जी, चोकोज, स्प्राईट, पॅम्पर्स, इंटेल इनसाईड, मोटोरोला असे शेकडो वस्तूंच्या खरेदी व विक्रीवर परिणाम झाला आहे. यामुळे इज्राईलवर या युध्दात मुळे आर्थिक संकट येण्याची शक्यता आहे.
What's Your Reaction?