विरोधीपक्षनेते पदी समीर साजिद बिल्डर यांची निवड...

 0
विरोधीपक्षनेते पदी समीर साजिद बिल्डर यांची निवड...

विरोधीपक्षनेते पदी समीर साजिद यांची निवड

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.18(डि-24 न्यूज) - प्रभाग क्रमांक 5 मधून निवडून आलेले एमआयएमचे अक्रामक नेते म्हणून ओळख असणारे नगरसेवक समीर साजिद बिल्डर यांनी पक्षाच्या वतीने विरोधीपक्षनेते म्हणून निवड करण्याचा निर्णय पक्षाचे सुप्रीमो खासदार असदोद्दीन ओवेसी आणि प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी घेतला आहे. प्रतिक्रिया देताना समीर यांनी सांगितले शहरातील नागरिकांच्या नागरी समस्या सोडवण्यासाठी आवाज उठवणार. पाण्याचा प्रश्न, रस्त्यांचा, खड्ड्यांचा, ड्रेनिज लाईन, पाण्याची नवीन पाइपलाइनमुळे रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवले नसतील अथवा महापालिकेशी संबंधित नागरिकांचे प्रश्नांवर आवाज अक्रामकपणे सभागृहात मांडणार, प्रश्न सोडविण्यासाठी माझ्याकडे नागरीकांनी संपर्क साधावा नक्की त्यांचे प्रश्न सोडवले जातील असे आवाहन त्यांनी केले आहे. समीरचे वडील स्व.अब्दुल साजिद बिल्डर महापालिकेत काँग्रेसचे दोनदा नगरसेवक होते त्यानंतर विरोधीपक्षनेते आणि दोनदा स्थायी समिती सभापती म्हणून शहराच्या विकासात बहुमोल योगदान त्यांचे राहिले आहे आता एमआयएमचे नगरसेवक म्हणून विरोधीपक्षनेते हे महत्त्वाचे पद त्यांना पक्षाने दिले आहे आता सत्ताधारी पक्षाकडून शहराच्या विकासासाठी कशी भूमिका ते भविष्यात ठेवतील येणाऱ्या काळात बघावे लागेल.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow