खाजगीकरण व कंत्राटीकरणाचा आदेश रद्द करावे म्हणून शासनाला जागे करण्यासाठी केले घंटानाद आंदोलन

 0
खाजगीकरण व कंत्राटीकरणाचा आदेश रद्द करावे म्हणून शासनाला जागे करण्यासाठी केले घंटानाद आंदोलन

खाजगीकरण व कंत्राटीकरणाचा आदेश रद्द करावा म्हणुन शासनाला जागे करण्यासाठी केले घंटानाद आंदोलन....!!!

औरंगाबाद, दि.18(डि-24 न्यूज) राज्य शासनाद्वारे 6 सप्टेंबर 2023 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे खाजगीकरण कंत्राटीकरणाचा निर्णय घेतला. यामुळे ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकास कोणत्याही आरक्षण धोरणाचे पालन न करता खाजगी एजन्सीच्या माध्यमातून सेक्युरिटी गार्ड प्रमाणे त्यांची नियुक्ती करून त्यांना 25 ते 35 हजार कायम स्वरूपी मानधन दिले जाईल.

      18 सप्टेंबर रोजी जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिकेच्या अशा साधारण 62 हजार शाळा खाजगी कार्पोरेट कंपन्यांना दत्तक देण्याचा निर्णय घेतला तर 21 सप्टेंबर रोजी कमी पटसंख्येच्या शाळा बंद करून समुह शाळा योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला. 

    अशा प्रकारचे अतिरेकी निर्णय घेऊन शिक्षण क्षेत्रातील वेतन श्रेणीमधील कायम स्वरूपी नौकऱ्या संपवुन खाजगी एजन्सीच्या माध्यमातून कंत्राटी पध्दतीने फिक्स पगारावर तात्पुरत्या स्वरुपात शिक्षकांची नियुक्ती करण्याला व गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा शासनाकडून उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

     मानवाची प्रगती, वैज्ञानिक विकास, पृथ्वी व अंतराळ क्षेत्र यामधील होणाऱ्या भौतिक व रासायनिक घडामोडी या सर्व गोष्टींचे ज्ञान आपल्याला फक्त शिक्षणामुळेच मिळते. तर आपण सध्याच्या जागतिक स्पर्धेत कसे टिकू.

       म्हणुन शिक्षणावरील खर्चाला खर्च न समजता त्याला गुंतवणूक समजावी व शिक्षण क्षेत्रात सुरू केलेले खाजगीकरण व कंत्राटीकरण धोरण तात्काळ रद्द करावे याकरिता राज्य शासनाला जागे करण्यासाठी जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीने आज क्रांती चौकात घंटा नाद आंदोलन करण्यात आले.

      यावेळी वाल्मीक सुरासे, प्रा. मनोज पाटील, प्रा. सुनील मगरे, प्रा. उमाकांत राठोड, नामदेव सोनवणे, युनुस पटेल, प्रदीप विखे, प्रकाश सोनवणे, एस. पी. जवळकर, सुभाष मेहर, शेख मन्सूर, शिवराम म्हस्के, चंद्रकांत चव्हाण, पुजा विठोरे, देवानंद वानखेडे, पद्माकर कांबळे, किरण मास्ट, सुनील जाधव, बी.एल.जाधव, शिवाजी चव्हाण, विजय द्वारकुंडे, विनायक येलम, रमेश आकडे, दत्ता पवार, विलास पाटिल, सलीम मिर्झा बेग, शेख मन्सूर, बिजू मारग, योगेश पाटील, सुनील पांडे, प्रकाश दाणे, पी.एम. पवार, रमेश जाधव, राजेश भुसारी, संतोष ताठे, किशोर पळसकर, इलाजुद्दीन फारुकी, अंकुश रावते, विजय ढाकरे, देवानंद वानखेडे, अवद चाऊस, पांडुरंग गोकुंडे, संजय चव्हाण, आनंद खरात, भास्कर म्हस्के, विलास जाधव, आसाराम शेळके, अरुण शिंदे, विजय निकम, अमोल सरदार, संतोष जैस्वाल, विलास त्रिभुवन, जनार्धन मस्के, सुदर्शन पवार, नामदेव थोटे, राजेंद्र ठाकरे, चंद्रकांत गायकवाड, गौतम अमृतफळे, बाळू भामरे, विजय मगरे, अशोक गायकवाड, संदीप खंडागळे, समाधान साबळे, मुरलीधर बनसोडे, शेख वाहेद, आरेफ शेख, मूजीब मुलतानी, नानासाहेब घोडे, रमाकांत छडीदार, अंकुश पाल, प्रदीप आम्ले, संदीप चव्हाण, रविंद देवरे, संजय गोंगे, लक्ष्मण मुळे, निलेश आंबेवाडीकर, अजय कदम, मोहन कदम, डॉ. मारोती तेगमपुरे, अरविंद सुर्यवंशी, सुनील राठोड, रखमाजी कांबळे, बहादूर पटेल, जावेद पटेल, शेख मुज्जमिल, सलिम खान, अवेज खान, सय्यद मुख्तार कादरी, हैदर सर, शाहेद शेख, शेख ईरफान, संपत ढमढेरे, विनोद केनेकर, नवनाथ मंत्री, समाधान पंडारकर, कृष्णा गोरे, सुधाकर पगारे, विलास देव, राजकुमार पैठणे, संदीप सोनवणे, देविदास वाहूळ, अजयकुमार खिल्लारे ईत्यादी शिक्षक उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow