शिवकालीन व ऐतिहासिक एकदिवसीय शस्त्र प्रदर्शनाचे अंबादास दानवे यांनी केले उद्घाटन

शिवकालीन व ऐतिहासिक एकदिवसीय शस्त्र प्रदर्शनाचे शुभारंभ...
शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या हस्ते पार पडला सोहळा...
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.16(डि-24 न्यूज): अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शिवकालीन व ऐतिहासिक एकदिवशी शस्त्र प्रदर्शन भरविण्यात आले. शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या हस्ते रविवार, 16 फेब्रुवारी रोजी या प्रदर्शनाचा शुभारंभ सोहळा संपन्न झाला. पारंपारिक वाद्य व ढोल ताशांच्या गजराने क्रांती चौक परिसर यावेळी दणाणून निघाला होता.
नांदेड येथील महाबली शहाजीराजे भोसले संग्रहालयाने संग्रहित केलेल्या एकूण 300 शिवकालीन,मराठेकालीन व ऐतिहासिक शस्त्राचे प्रदर्शन भरविण्यात आले. शहरातील शिवप्रेमीसाठी संपूर्ण दिवसभर हे शस्त्र प्रदर्शन खुले असून सर्वांनी याचा आनंद घ्यावा, असे आवाहन यावेळी बोलतांना दानवे यांनी केले.
सध्याच्या तरुणांना शिवकालीन, मराठेकालीन व ऐतिहासिक शस्त्राची जाण नाही. छत्रपती शिवाजी महाराज व मराठा साम्राज्यातील सैनिक प्रचंड वजनदार असलेल्या शस्त्रासह कसे युद्ध करत होते, याची जाणीव हे प्रदर्शन बघितल्यानंतर झाली. प्रेरणा, शक्ती, ऊर्जा आणि ताकद या प्रदर्शनातून मिळाली असल्याची भावना अंबादास दानवे यांनी यावेळी व्यक्त केली..
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भोसले कुटुंबियांचे जन्मगाव छत्रपती संभाजीनगर आहे. राज्यभर महाराष्ट्र शासनाच्या वतीने छत्रपती शिवरायांच्या वाघनखांचे प्रदर्शन भरविले जात असून शिवरायांच्या मूळगावी छत्रपती संभाजीनगरातच प्रदर्शन भरविले जात नसल्याची खंत व्यक्त करत संभाजीनगरात हे प्रदर्शन भरविले जावे अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारावर चाललो तर जीवनात कधीच अपयश येणार नाही. शिवरायांची युद्धनीती आणि प्रशासन नीती आपण विसरत चाललो, असल्याची खंत दानवे यांनी व्यक्त केली. सकाळपासून भरलेले या प्रदर्शनास मोठ्या संख्येने शिवप्रेमीनी भेट दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहर संघटक सचिन तायडे यांनी केले.
प्रदर्शनातील शिवप्रेमींसाठी ठेवलेले शस्त्र...
हिंदवी स्वराज्यातील छत्रपती शिवाजी महाराजांची अस्सल नाणी शिवराई, शिवरायांची दुदांडी नाणी, रायगडी शिवराई, पेशवे कालीन मराठा नाणी, खंडा तलवार, गुर्ज
मराठा धोप, विजयनगर साम्राज्य कट्यार, वाघनखे, ब्रिटिश तलवार, भाला, कत्ती तलवार, मराठा तलवार, मुघल तलवार, माडू, दांडपट्टा, ढाल, तोफगोळा, तोफ, कुलपी गोळा, जबरदंड, जननाळ, तेगा तलवार, मराठा कट्यार, मुघल कट्यार, गड किल्याचे कुलूप, कुकरी, अंकुश, चिलानम, बिचवा, धनुष्यबाण, राजपूत तलवार, खंजराली, जंबिया व गुप्ती असे एकूण 300 शिवकालीन व ऐतिहासिक शस्त्रे यावेळी प्रदर्शनाच्या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे.
पाळणा गीत स्पर्धा व मराठेकालीन शस्त्राच्या साहसी खेळांचे आयोजन...
सोमवार, 17 फेब्रुवारी रोजी क्रांती चौक येथे सायंकाळी ४ ते ६ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांचे पाळणा गीत सादरीकरण स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती व मानवंदना कार्यक्रम झाल्यानंतर सायंकाळी ७ ते ९ वाजता मराठेकालीन शस्त्रांचे साहसी खेळ संपन्न होणार आहे.
याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख संतोष जेजुरकर, विजय वाघमारे, संतोष खेंडके,शहरप्रमुख बाळासाहेब थोरात,हरीभाऊ हिवाळे, ज्ञानेश्वर डांगे,विधानसभा संघटक गोपाल कुलकर्णी,शहरसंघटक सचिन तायडे, कामगार सेनेचे नेते प्रभाकर मते पाटील,उपशहरप्रमुख सुरेश मामा पवार, प्रकाश कमलानी, राजेंद्र दानवे, संजय हरणे, नितीन पवार, बापू कवळे, सुगंधकुमार गडवे, बापू पवार, श्रावण उधाघे, जयसिंग होलिये, अनिल लहाने, प्रमोद ठेंगडे, प्रवीण दुबिले,गोरख सोनवणे, अनिल थोटे, राहुल थोरात, गणेश मोगल, सलीम खामगावकर,महिला आघाडी जिल्हा संघटक आशा दातार,महानगर संघटक मीना फसाटे,सुकन्या भोसले,शहर संघटक सुनिता औताडे, सुनिता सोनवणे, सुचिता आंबेकर, अरुणा पुणेकर, रेखा वाहटूळे, अनिता पाटील, शारदा घायवट, नुसरत जहाँ, युवासेना सहसचिव धर्मराज दानवे, अविनाश अग्निहोत्री, दिनेशराजे भोसले, नंदू लबडे व रणजीत
दाभाडे उपस्थित होते.
What's Your Reaction?






