शहरात नशामुक्तीचा संदेश देण्यासाठी ऐतिहासिक आमखास मैदानावर भव्य बोकड्यांचे प्रदर्नाला गर्दी...!

 0
शहरात नशामुक्तीचा संदेश देण्यासाठी ऐतिहासिक आमखास मैदानावर भव्य बोकड्यांचे प्रदर्नाला गर्दी...!

पहिल्यांदाच शहरात भव्य विविध प्रकारच्या बोकड्यांचे प्रदर्शन नशामुक्तीसाठी

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.16(डि-24 न्यूज) युवकांनी बेरोजगारीला कंटाळून नशेच्या आहारी न जाता विविध प्रकारच्या जनावरांच्या पालन पोशणाकडे वळून गोट फाॅर्म सुरू करुन व्यवसाय करावा हा संदेश देण्यासाठी ऐतिहासिक आमखास मैदानावर पहिल्यांदाच शहरात विविध प्रकारचे बोकड्यांचे प्रदर्शन बघण्यासाठी गर्दी झाली. युवकांनी अशा प्रकारचे जनावरांचे पालनपोषण करण्याचा नशा करावा असे आवाहन गोट फाॅर्म लव्हर्सनी यावेळी दिला. 

औरंगाबाद गोट लव्हर्सच्या वतीने All Bread Gots Exhibition चे एक दिवसीय आयोजन करण्यात आले होते. सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत गोट लव्हर्सनी बघण्यासाठी या शेकडो स्टाॅलवर गर्दी केली होती. बोकड्यासाठी लागणारे खाद्य व औषधांचे स्टाॅल पण याठिकाणी लागले होते. आपल्या विविध प्रकारच्या बोकड्यांची सजावट करुन व त्यांचे नावे ठेवलेल्या बोकड्यांना प्रदर्शनात सजावट करण्यात आली होती. महाराष्ट्रातील गाॅट चालकांनी सानियन, कोटा, जमनापरी, खली, हैदराबादी, बैंटम, बरबरी, जिंग, बोर, विलायती जातीचे बोकडे व मेंढे आकर्षणाचे केंद्र बनले होते. या प्रदर्शनाला मोठ्या प्रमाणात लोकांनी गर्दी करुन माहिती घेतली आपला व्यवसाय सुरू करण्यासाठी लोकांना या प्रदर्शनाचा फायदा झाला. या प्रदर्शनात दिडशे किलोचे सुंदर बोकूड आले होते. हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात देशात विस्तारत आहे यामुळे शेतकरी वर्गाला सुध्दा जोडधंदा मिळत आहे. पहिल्यांदाच असोसिएशनचे सदस्य यांनी एकत्र येत नवीन काही करायचे म्हणून नवयुवकांसाठी पर्यायाने व्यासपीठ उपलब्ध करून दिले अशी माहिती डि-24 न्यूजला असोसिएशनचे सदस्य रहीमोद्दीन उर्फ गुड्डू यांनी दिली आहे

.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow