भडकलगेट येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर, टिव्ही सेंटर येथील छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा सुशोभीकरणासाठी काढणार...!

 0
भडकलगेट येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर, टिव्ही सेंटर येथील छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा सुशोभीकरणासाठी काढणार...!

भडकलगेट येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर, टिव्ही सेंटर येथील छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा सुशोभीकरणासाठी काढणार...!

पुतळा काढण्यासाठी वाहतूक बंद असणार आहे, शहर पोलिसांचे आवाहन...

छ.संभाजीनगर(औरंगाबाद)दि.22(डि-24 न्यूज) भडकलगेट येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर व टिव्ही सेंटर चौक येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचे व चौकाचे सुशोभीकरण करण्याचे काम सुरू करण्यासाठी दोन्ही पुतळे सुरक्षित स्थळी हलविण्यात येणार आहे यासाठी या रस्त्यावर वाहतूक बंद राहणार आहे असे आवाहन शहर पोलिसांच्या वतीने पोलिस उपायुक्त प्रशांत स्वामी यांनी केले आहे.

आज पोलिस आयुक्त कार्यालयात या संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सुशोभीकरणाचे काम सुरू करण्यात येणार आहे. या बैठकीत आमदार प्रदीप जैस्वाल तसेच सर्व अनुसूचित संघटना व हिंदू संघटनांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाचे संबंधित अधिकारी व शहरातील प्रतिष्ठित नागरिक व पत्रकार उपस्थित होते.

याप्रसंगी पोलिस आयुक्त संदीप पाटील, पोलिस उपायुक्त नितीन बगाटे, पोलिस उपायुक्त नवनीत काॅवत, पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी आदी उपस्थित होते.

दिनांक 24 जून 2024 रोजी भडकलगेट येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा तर 26 जून रोजी टिव्ही सेंटर येथील छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा काढण्याची कारवाही करण्यात येणार आहे. त्या दिवशी टिव्ही सेंटर व भडकलगेट येथील वाहतूक बंद करण्यात येणार असून पर्यायी मार्गाबाबत वाहतूक विभागाच्या वतीने अधिसूचना काढण्यात येणार आहे. पोलिस आयुक्त संदीप पाटील यांच्या वतीने नमूद पुतळ्यांच्या सुशोभीकरणाच्या अनुषंगाने कोणीही अफवा पसरवू नये तसेच पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow