समाजवादी शहरातील एका जागेवर निवडणूक लढणार, अबु आझमींनी केली उमेदवारांची चाचपणी...!
समाजवादी शहरातील एका जागेवर निवडणूक लढणार, अबु आझमींनी केली उमेदवारांची चाचपणी...!
छ.संभाजीनगर(औरंगाबाद)दि.22(डि-24 न्यूज) समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार अबु असिम आजमी हे दोन दिवसांपासून शहराच्या दौ-यावर आलेले आहे. त्यांनी दौलताबाद प्रकरणात पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेऊन एकतर्फी कारवाई करु नका अशी सूचना केली. यावेळी शहराध्यक्ष फैसल खान व पदाधिकारी उपस्थित होते.
काही महीन्यात विधानसभेची निवडणूक असल्याने शहरातील प्रतिष्ठित नेत्यांची भेट घेऊन त्यांनी चर्चा केली. शहरातील औरंगाबाद मध्य, औरंगाबाद पूर्व व औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघांपैकी एका जागेवर निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले. अल्पसंख्याक समाजाचे प्रश्न सोडवणार का हा प्रश्न आगामी निवडणुकीत राजकीय पक्षांच्या नेत्यांसमोर ठेवूनच मतदान करावे. समाजाची लोकसंख्या व मतदारांची संख्या गृहीत धरून जागा द्यावी. मुस्लिम आरक्षणाचा प्रश्न व अन्य प्रश्न मार्गी लावणा-या पक्षांना मतांचे विभाजन न करता आतापासूनच नियोजन करावे. मतांचे विभाजन करणा-या उमेदवारांना उभे राहण्यास समजूत काढून रोखावे. महाविकास आघाडीने विधानसभा निवडणुकीत सन्मानजनक जागा दिले तर सोबत येऊ नाही तर 20 ते 25 जागेवर समाजवादी आपले उमेदवार देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. अल्पसंख्याक मतांवर सत्तेसाठी सर्वांचा डोळा आहे परंतु सत्ता आल्यानंतर त्यांचे प्रश्न कोण सोडविणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आघाडी सरकारने मुस्लिम समाजाला त्यांचे सरकार असताना 5 टक्के आरक्षण दिले होते. आगामी विधानसभा निवडणुकीत आरक्षण देण्यासाठी कायदा बणवणार का हे वचन देणार का असा प्रश्न उपस्थित करावा असे आवाहन त्यांनी यावेळी येथील नागरिकांना केले आहे तर जातीयवादी शक्तींना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी विधानसभा निवडणुकीत तयारीला लागा असे आदेश कार्यकर्त्यांना बैठकीत दिले आहे. त्यांनी आज धर्मनिरपेक्ष पक्षाच्या नेत्यांसोबत राजकीय परिस्थितीवर चर्चा केली.
त्यांनी राष्ट्रवादीचे नेते कमाल फारुकी यांचे सुपुत्र बॅ. उमर फारुकी व मुस्लिम इत्तेहाद फ्रंटचे अध्यक्ष जावेद कुरैशी यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. या व्यतिरिक्त काही प्रतिष्ठित नागरीकांची भेट घेऊन चर्चा के
ली.
What's Your Reaction?