महापालिका निवडणुकीचे राजकारण तापले, अतुल सावे व संजय शिरसाट यांच्यावर सतीश चव्हाणांची टिका...

 0
महापालिका निवडणुकीचे राजकारण तापले, अतुल सावे व संजय शिरसाट यांच्यावर सतीश चव्हाणांची टिका...

महापालिका निवडणुकीचे राजकारण तापले, अतुल सावे व संजय शिरसाट यांच्यावर सतीश चव्हाणांची टिका...!

"वेळ बदलाची" टॅग लाईन घेऊन जाहिरनामा, बदल घडवण्यासाठी जनतेसमोर जाणार असल्याची सतीश चव्हाण यांची माहिती...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.6(डि-24 न्यूज) - सिडकोचे लिज होल्डचे  फ्री होल्ड झाले, सिडकोतील रहीवाशांना मालकिहक्क मिळणार, शहरात फटाके फुटले, मोठमोठे होर्डिंग्ज लागले परंतु आतापर्यंत अंमलबजावणी नाही. पाण्याच्या योजनेचेही तसेच आश्वासन शहरातील जनतेला मिळाले पण आत्तापर्यंत पाणी मिळाले नाही. मागिल अनेक वर्षे महापालिकेत भाजपा शिवसेनेची सत्ता राहिली पाण्याचा प्रश्न मिटला नाही. पाण्याच्या योजनेवर सत्ताधारी व विरोधी एक दुस-यांवर आरोप करतात. संजय शिरसाट यांनी अनेकदा पाण्याच्या प्रश्नावर वक्तव्य केले. वर्तमानपत्रांतून आलेल्या बातम्या पत्रकार परिषदेत वाचून दोन्ही मंत्र्यांवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार तथा जिल्हाध्यक्ष सतीश चव्हाण यांनी चौफेर टीका केली. याप्रसंगी शहराध्यक्ष अभिजित देशमुख, उमेदवार सलिम पटेल आदी उपस्थित होते.

त्यांनी महापालिका निवडणुकीचा जाहिरनामा प्रसिद्ध करताना आयोजित पत्रकार परिषदेत आरोप केल्याने स्वबळावर निवडणूक लढणा-या राष्ट्रवादीची "वेळ बदलाची" हि टॅग लाईन घेवून जनतेसमोर मते मागण्यासाठी जाणार आहे. विकासाचा बारामती पॅटर्न राबवणार आहे. महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचे 78 उमेदवार रिंगणात आहेत. अल्पसंख्याक मुस्लिम 22 उमेदवारांना तिकीटे दिली. सर्व जाती धर्मातील कार्यकर्त्यांना उमेदवारी देवून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केला आहे. दुसऱ्या पक्षात तिकिटावरुन वाद विवाद झाले राष्ट्रवादीत असे झाले नाही.

पक्षाने पिंपरी चिंचवड, पुणे व बारामतीत सत्तेत राहून जो विकास केला तोच ध्येय घेऊन निवडणुकीला सामोरे जात आहे. यंदा जनता नक्कीच बदल घडवेल शहराला 24 तास शुद्ध पाणी मिळावे. नवीन शहर विकास आराखड्याप्रमाणे अंतर्गत रस्ते असावेत. कच-याची समस्या दूर व्हावी. गुंठेवारीचा प्रश्न निकाली निघावा. अतिक्रमणग्रस्तांना नुकसानभरपाई मिळावी. अपूर्ण असलेले महत्वाचे प्रकल्प त्वरित पूर्ण व्हावे असा आमचा प्रयत्न असणार आहे. शहराचा सर्वांगीण विकास व चित्र बदलण्याचा आमचा संकल्प आहे. आतापर्यंत स्थानिक नेत्यांनी केवळ जाती धर्माचे राजकारण करुन सत्ता उपभोगली. मागिल 30 वर्षात जसा विकास शहराचा व्हायला पाहिजे तसा झाला नाही. पाणी, कचरा व रस्ते या मुलभूत समस्यांवर राज्यकर्त्यांना काम करता आले नाही. महापालिकेत 30 वर्षाहुन अधिक सत्ता युतीची राहिली. तरीही शहरातील जनतेला मुलभूत सुविधेसाठी संघर्ष करावा लागतो आहे. 

शहराला आठवड्यातून एकदा पाणी मिळते. ट्राफीक वाढली व पार्कींग व्यवस्था नाही. वाहतूकीची समस्या आहे. मुख्य रस्त्यांना अतिक्रमणाने वेढलेले आहे. घंटागाड्या लोकसंखेच्या हिशोबाने कमी दिसतात. एवढ्या समस्या असताना सत्ताधारी स्थानिक नेत्यांनी धर्माचे राजकारण करण्यात धन्यता मानली. अशी टिका शिवसेना व भाजपाच्या नेत्यांवर आमदार सतीश चव्हाण यांनी केली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow