इब्राहीम पटेल यांनी डोअर-टु-डोअर जावून घेतल्या मतदारांच्या भेटीगाठी...प्रचारात आघाडी
इब्राहीम पटेल यांनी डोअर-टु-डोअर जावून घेतल्या मतदारांच्या भेटीगाठी, घेतली प्रचारात आघाडी...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.6(डि-24 न्यूज) - महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 12 चे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार इब्राहीम पटेल यांनी आज किराडपुरा व रहेमानिया काॅलनी येथे डोअर-टु-डोअर मतदारांची भेट घेतली. प्रभागातील जनतेच्या समस्या जाणून घेतल्या. पिण्याचे पाणी किती दिवसांनी येथे, साफसफाई होते का, रस्ते कसे आहेत, ड्रेनिज, स्ट्रेट लाईट, ट्राफिकची समस्या, लहान मुलांना खेळाचे मैदान, आरोग्य व शिक्षणाचे प्रश्न जाणून घेतल्या. मतदारांनी या निवडणुकीत निवडून दिले तर सर्व प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन मतदारांना दिले. मतदारांनी भेटीदरम्यान 15 जानेवारी रोजी इब्राहीम पटेल यांचे निवडणूक चिन्ह पंजा निशानीवर मते देणार असा विश्वास दिला. कटकट गेट, रहेमानिया काॅलनी, शरीफ काॅलनी व किराडपुरा येथील मतदारांनी इब्राहीम पटेल यांना बहुमताने विजयी करण्याचा संकल्प घेतला असल्याची परिस्थिती आहे. नगरसेवक पदाचा व सामाजिक कार्याचा दांडगा अनुभव त्यांच्यासोबत असल्याने मतदार त्यांना विजयी करतील. अशी चर्चा प्रभागात सुरू आहे.
यावेळी ताहेर पटेल, इस्माईल पटेल, शाकेर पटेल, सदफ पटेल, शेख नईम, शेख आसेफ, शेख आरेफ, श्रीराम इंगळे, रफीक पटेल, अब्बु पटेल, सरनवाज अन्सारी, शफी मौलाना, फेरोज खान, फय्यू शेख, निसार पटेल, शौकत पटेल, खालिक देशमुख, शेख हुजुर, शेख अस्लम, बिस्मिल्ला खान, जाकेर पटेल व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
What's Your Reaction?