हर्सुलमध्ये राष्ट्रवादीचे प्रचार कार्यालयाचे उद्घाटन संपन्न...
हर्सुलमध्ये राष्ट्रवादीचे प्रचार कार्यालयाचे उद्घाटन...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.5 डि-24 न्यूज) - महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला सर्व उमेदवारांनी सुरू केले आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पार्टीचे प्रभाग क्रमांक 1 चे अधिकृत उमेदवार शेख अयूब पटेल व पुरस्कृत उमेदवार एड विजयश्री अण्णा मोकळे यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील यांच्या शुभहस्ते करुन प्रभागात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून रैली काढण्यात आली. याप्रसंगी परिसरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हा सचिव प्राचार्य सलिम शेख यांनी यावेळी कोणत्याही आमिषाला बळी न पडता दोन्ही उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले. जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील यांनी सांगितले प्रभाग क्रमांक 1 मध्ये पाण्याचा, कच-याचा व रस्ता रुंदीकरण, मुलभूत सुविधांचा अभाव आहे. सत्ताधारी पक्षांनी परिसराचा विकास केला नाही म्हणून आज मतदारांसमोर पर्याय आहे. निवडून दिल्यास सर्व नागरी समस्या प्राधान्याने सोडविणार असल्याचे आश्वासन दिले.
याप्रसंगी प्राचार्य सलिम शेख, वाजेद अस्लम, थोरात, बाबुराव पंडित, मोकळे अण्णा, अब्दुल अजिम व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
What's Your Reaction?