महापालिकेच्या वतीने जागतिक लोकसंख्या दिन सप्ताह कार्यक्रम...

महापालिकेच्या वतीने जागतिक लोकसंख्या दिन सप्ताह कार्यक्रम...
छत्रपती संभाजिनगर (औरंगाबाद), दि.11(डि-24 न्यूज)-
जागतिक लोकसंख्या दिन सप्ताहानिमित्ताने महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने 11 जुलै ते 18 जुलैपर्यंत विविध कार्यक्रम घेत सप्ताह साजरा केला जात आहे. आज एन-11 रुग्णालयात आरोग्य अधिकारी डाॅ.पारस मंडलेच्या यांच्या अध्यक्षतेखाला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. बालरोगतज्ञ डाॅ.मनोज बजाज यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यानिमित्ताने आरोग्य अधिकारी डाॅ.कल्पना राठोड, स्त्रीरोगतज्ज्ञ यांनी लाभार्थ्यांना कुटुंब नियोजन तात्पुरत्या व कायमस्वरुपी साधना विषयी माहिती देऊन लोकसंख्या नियंत्रण कसे राहिल याबद्दल मार्गदर्श़न केले. यावेळी एन-11 रुग्णालय येथील सर्व स्टाफ, कर्मचारी व परिसरातील नागरीक उपस्थित होते. जागतिक लोकसंख्या दिन घोष वाक्य "आई होण्यासाठी योग्य वय तेव्हा शरीर व मनाची तयारी जेव्हा"
सर्व आरोग्य केंद्रामध्ये विविध उपक्रम राबविण्यात आले. जागतिक लोकसंख्या दिनाचे औचित्य साधून 11 जुलै ते 18 जुलै पर्यंत जनजागृती करुन या कालावधित शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
What's Your Reaction?






