उघड्यावर विना परवाना मांसविक्री करणा-यांविरुध्द मनपाची कार्यवाई...

 0
उघड्यावर विना परवाना मांसविक्री करणा-यांविरुध्द मनपाची कार्यवाई...

उघड्यावर विना परवाना मांसविक्री करणा-यांविरुध्द मनपाची कार्यवाई...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.13(डि-24 न्यूज)- विना परवाना मांसविक्री करणे, उघड्यावर मांस विक्री करणाऱ्या विरोधात मनपा प्रशासनाने शहरात धडक दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. आज शहरात 30 दुकानांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी महापालिकेचे नाहरकत प्रमाणपत्र, मनपाची परवानगी नसलेल्या दहा दुकानधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच मुख्य पोस्ट ऑफीस समोरील आपसा बिफ शाॅपचे मालक अजहर कुरेशी हे विना परवाना व मनपाची पावती न घेता अनधिकृतपणे मांस विक्री करत असल्या कारणामुळे त्यांच्याविरुद्ध सिटीचौक पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून मांस जप्त करण्यात आले. दुपारच्या सत्रांमध्ये पडेगाव स्लाॅटर हाऊस येथे भेट देण्यात आली सदर ठिकाणी दिवसभरात एकूण 56 जनावरे कट करण्यात आली असल्याचे कळाले.

सदर कार्यवाई मनपा पशुधन अधिकारी डॉ.शाहेद शेख, सहायक आयुक्त(अतिक्रमण) संजय सुरडकर, सहायक पोलिस निरीक्षक कल्पेश देशमुख व पोलिस कर्मचारी, इमारत निरीक्षक रविंद्र देसाई, व पशुधन कर्मचारी यांनी केली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow