संग्राम जगताप यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी करण्याची काँग्रेसची मागणी...

आमदार संग्राम जगताप यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करावे याकरिता अल्पसंख्यांक शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने विभागीय आयुक्त यांना निवेदन...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.13(डि-24 न्यूज)-आज अल्पसंख्यांक शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अहिल्यानगर(अहमदनगर) राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा तसेच दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे वक्तव्य केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्यात यावी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात यावी असे निवेदन विभागीय आयुक्त यांना देण्यात आले. यावेळी शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख युसूफ, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सरचिटणीस डॉ. जफर अहमद खान, महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक विभागाचे महासचिव शेख इंजिनियर इत्तेखार, अल्पसंख्यांक जिल्हा काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनिस पटेल, अल्पसंख्यांक शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे मोईन इनामदार, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अकेफ रजवी, महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक विभागाचे सचिव साजिद कुरेशी, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव इंजिनिअर मोहसीन खान, अल्पसंख्यांक शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष सय्यद फराज अबेदी, अल्पसंख्यांक पूर्व विधानसभेचे अध्यक्ष शाहेबाज सैय्यद, नदीम सौदागर, श्रेयश चव्हाण, मजाज खान, सलीम पटेल, सलमान खान, गौतम नरवडे आदी उपस्थित होते.
What's Your Reaction?






