जिल्हा परिषद सदस्य पदासाठी 63 जागेचे आरक्षण सोडत कार्यक्रम संपन्न...

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील जिल्हा परिषद सदस्य पदासाठी 63 जागेचे आरक्षण सोडत कार्यक्रम संपन्न
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि 13 (डि-24 न्यूज)-जिल्ह्यातील जिल्हा परिषद सदस्यांच्या जागांसाठी आरक्षण सोडत कार्यक्रम आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात संपन्न झाला. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 मधील तरतुदीनुसार महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या जागांचा आरक्षणाची पद्धत व चक्राणूक्रम नियम 2025 नुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रात सभा घेऊन अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग, व त्यामधील महिलांसाठी राखून ठेवायचे जागा, सर्वसाधारण महिला राखून ठेवायच्या जागा निश्चित करण्यात आल्या. एकूण 63 जागा असून यामध्ये 52 जागा सर्वसाधारण प्रवर्गामध्ये आहेत. यामध्ये 17 जागा नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत. तसेच यातच महिलांसाठी नऊ जागा आरक्षित करण्यात आलेल्या आहेत. अनुसूचित जातीसाठी आठ जागा राखीव करण्यात आले. यामध्ये चार जागा महिलांसाठी राखीव करण्यात आलेल्या आहेत. तसेच अनुसूचित जमाती तीन जागा आरक्षित असून दोन जागा अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. जागेच्या या सोडतीवर आरक्षण कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर ज्या नागरिकांना यावर आक्षेप नोंदवायच्या आहेत त्यांनी 14 ते 17 या ऑक्टोबर 2025 यादरम्यान उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन यांच्याकडे, हरकती व सूचना करण्याचा कालावधी देण्यात आलेला आहे. आरक्षण सोडत कार्यक्रम जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी अपर जिल्हाधिकारी संभाजी अडकूने, उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासनाच्या संगीता राठोड ,उपजिल्हाधिकारी एकनाथ बंगाळे, तहसीलदार जिल्हा परिषद निवडणूकचे दिनेश झांपले आणि जिल्ह्यातील नागरिकांची उपस्थिती यावेळी होती. कुमारी सान्वी वाघ या लहान मुलीच्या हस्ते आरक्षणाच्या चिठ्ठ्या काढण्यात आल्या.
What's Your Reaction?






