मराठा आरक्षण उपोषणकर्त्या राजश्री उंबरे यांची मंत्री अतुल सावे यांनी घेतली भेट

मराठा आरक्षण उपोषाणकर्त्या राजश्री उंबरे पाटील यांची मंत्री श्री अतुल सावे यांनी घेतली भेट.
पाणी पाजून मुंबईत येण्याचे आवाहन..
चर्चेतून लवकरच मार्ग काढू -गृहनिर्माण मंत्री श्री अतुल सावे
उपोषणाचा आजचा 10 वा दिवस
छ. संभाजीनगर(औरंगाबाद), दि.11(डि-24 न्यूज) मराठा आरक्षणासाठी क्रांती चौकात उपोषणाला बसलेल्या उपोषाणकर्त्या राजश्री उंबरे पाटील यांची प्रकृती खालावत आहे. त्यांच्या उपोषणाचा आजचा 10 व्या दिवशी राज्याचे गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री श्री अतुल सावे यांनी बुधवारी त्यांची भेट घेत पाणी पाजत उपोषण सोडण्याचे विनंती केली. यावेळी त्यांनी बोलतांना सांगितले की, लवकरच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या समवेत या संदर्भात बैठक घेऊ तसेच चर्चा करून मार्ग काढण्यात येईल. यासाठी शिष्टमंडळाने आमच्या समवेत मुंबईमध्ये बैठकीत साठी यावे असे आवाहन देखील त्यांनी या प्रसंगी केले.
मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, इडब्ल्यूएस आरक्षण लागू करावे, मराठवाड्यासाठी हैदराबाद गॅझेट लागू करावा यासह आदी 21 मागण्या साठी धर्मवीर संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्या प्रदेशाध्यक्ष राजश्री उंबरे पाटील यांनी दिनांक 2 तारखेपासून क्रांती चौक येथे उपोषण सुरू केले आहे. आज त्यांच्या उपोषणाचा 10 दिवस होता. यावेळी मंत्री श्री अतुल सावे यांनी भेट देत सविस्तर चर्चा केली.
What's Your Reaction?






