पिर बाजार सोमवारीच भरावा, रविवारी भरण्यास पथविक्रेतांचा विरोध

 0
पिर बाजार सोमवारीच भरावा, रविवारी भरण्यास पथविक्रेतांचा विरोध

पिर बाजार सोमवारीच भरावा, रविवारी भरण्यास पथविक्रेतांचा विरोध

औरंगाबाद, दि.5(डि-24 न्यूज) पिर बाजार मागिल अनेक वर्षांपासून सोमवारी भरतो पण मनपा प्रशासनाने अचानक एकतर्फी निर्णय घेत हा बाजार रविवारी भरविण्याचा निर्णय घेतल्याने पथविक्रेता व व्यापा-यांचे नुकसान होत आहे. जुना मोंढा येथेही रविवारी बाजार भरतो यामुळे अनेक समस्या निर्माण होतात यामुळे आज महापालिकेसमोर शहीद भगतसिंग हाॅकर्स युनियनने अॅड अभय टाकसाळ यांच्या नेतृत्वाखाली तीव्र धरणे आंदोलन केले. त्यांनी मागणी केली आहे हा बाजार सोमवारी भरावा. वाढती वाहनांची संख्येला पथविक्रेता जवाबदार नाही. शहरातील सिटीबस बंद करण्यात आली त्या काळात नाईलाजाने नागरीकांनी मोठ्या प्रमाणात दुचाकी चारचाकी विकत घ्यावे लागले. सार्वजनिक वाहतूक कमजोर केल्याने हे घडले. रस्ते कितीही मोठे केले, उड्डाणपूल बांधले तरीही वाहनांची संख्या वाढत जाणार आहे. या वाढत्या ट्राफीकला पथविक्रेते जवाबदार नाही.

गेल्या 50 वर्षांपासून उस्मानपुरा येथे हा बाजार सोमवारी भरतो आहे. वाढती वाहनांची संख्या व ट्राफीकला बाजारातील हातगाडीवाले व व्यापारी नसून मनपा प्रशासन व राजकारणी आहेत. ट्राफीक समस्येमुळे पथविक्रेते यांना काढून भाजीवाली बाईच्या पुतळ्याकडे हलवण्यात आले. नंतर तेथून शहानूरमिया दर्गाह जवळील मैदानावर हाकलण्यात आले. आता अचानक मनमानीपणे पथविक्रेत्यांशी चर्चा न करता आपला बाजार सोमवारी ऐवजी रविवारी भरवायचा एकतर्फी निर्णय घेण्यात आला. हा निर्णय आम्हाला मान्य नाही. पीर बाजार हा सोमवारीच भरला पाहिजे. गांधीनगरचा बाजार आणि दर्गाह जवळचा बाजार रविवारी असल्याने व्यवसायावर परिणाम होत आहे. कमाई होत नाही, माल वाया जातो, ट्राफीक कमी करण्यासाठी सिटी बस वाढवले पाहिजे. ऑस्ट्रेलियातील मेलबर्न शहराची लोकसंख्या देखील आपल्या शहराच्या जवळपास आहे. तेथे ट्राम आणि सिटीबस मोफत असल्याने रस्त्यावर खाजगी वाहने दिसत नाही. सरकारला रस्ते मोठे करण्यासाठी जमीन अधिग्रहण करण्याची गरज पडत नाही. यामध्ये सरकारी पैशांची बचत होते. अधिकारी व पोलिसांवर ताण कमी होतो असा मेलबर्नचा अनुभव आहे. सिटीबस मोफत प्रवास सेवा सुरू करावी व बाजार सोमवारी भरावा हि मागणी यावेळी करण्यात आली आहे.

यावेळी अॅड अभय टाकसाळ, शेख समीर, शांताबाई पवार, राखी रमंडवाल, सुनिता कांबळे, सविता तवळे, शरुभाई, शकुंतलाबाई, रंजना दळवे, मनिष नवपूते, राम करवंदे, सुमोनात रिठे, घनश्याम करवंदे, भारती रिठे आदी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow