इमाव विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी वस्तीगृह, प्रवेश प्रक्रीया सुरु...

 0
इमाव विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी वस्तीगृह, प्रवेश प्रक्रीया सुरु...

इमाव विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी वसतीगृह; प्रवेश प्रक्रिया सुरु...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.29(डि-24 न्यूज)- इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतीगृह प्रवेशासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांना वसतीगृह प्रवेश मिळू शकत नाही अशांसाठी पंडीत दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी अर्ज मागविण्याचे वेळा पत्रक याप्रमाणे निश्चित झाले आहे असे सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण दत्तात्रय वाघ यांनी कळविले आहे. 

इच्छुक अर्जदारांनी https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर अर्ज करावयाचा आहे. त्यास्ठी 12 वी नंतर व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेले (बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) विद्यार्थ्यांनी दि.1 ते 18 सप्टेंबर या कालाव्दहीत अर्ज करावा. अर्ज छाननी दि.19 ते 24 सप्टेंबर या कालावधीत होईल. पहिली निवड यादी दि.25 रोजी प्रसिद्ध होईल. त्यानुसार दि.6 ऑक्टोंबर पर्यंत प्रवेशासाठी अंतिम मुदत असेल. तर रिक्त जागेवर प्रवेशासाठी दुसरी यादी दि.9 ऑक्टोंबर रोजी प्रसिद्ध होईल. दुसऱ्या निवड यादीतील प्रवेशासाठी दि.17 ऑक्टोंबर ही अंतिम मुदत असेल.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow