माजी नगरसेवकाच्या हाॅटेलवर जुगार अड्ड्यावर छापा, 24 जणांना घेतले ताब्यात...

 0
माजी नगरसेवकाच्या हाॅटेलवर जुगार अड्ड्यावर छापा, 24 जणांना घेतले ताब्यात...

सावंगीच्या माजी नगरसेवकाच्या हाॅटेलवर जुगार अड्ड्यावर छापा, 24 जणांना पकडले...

12 लाखांचा ऐवज जप्त; 

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.30(डि-24 न्यूज) - जळगाव महामार्गावरील सावंगी-हर्सूल परिसरातील पुणम हॉटेलमध्ये सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांच्या पथकाने शुक्रवार, 29 ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास छापा मारला. यात 24 जणांना जुगार खेळताना पकडले. त्यांच्या ताब्यातून 12 लाख 63 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, याप्रकरणी फुलंब्री ठाण्यात जुगाऱ्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सावंगी परिसरातील पूनम हॉटेलमध्ये बेकायदेशीरपणे पत्त्याचा क्लब सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस अधीक्षकांच्या पथकासह फुलंब्री ठाण्याच्या पथकाने हॉटेलच्या मागील बाजूस सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर शुक्रवारी रात्री छापा टाकला. यावेळी गुलशेर खान (सावंगी हर्सूल), सय्यद नावीद अली (रोशन गेट), संदीप प्रकाश हिवराळे (जुबली पार्क), महिंद्रा चंद्रशेखर जैन (शहागंज), सलीम पठाण गुलाम अहेमद (मिटमिटा), विशाल कृष्णा जाधव (मयूर पार्क), विजय भगवान सुपेकर, चंदन शांतीलाल पडगे, योगेश रामकिसन पिठोरे, अभिमन्यू सांडूलाल पहाडिया (चेलीपुरा), सदानंद चापलोत, दिगंबर रामराव गाडेकर, राजू प्रकाश बटावडे (जाधववाडी), शेख गुलाम शेख हमीद (खोकडपुरा), आकाश मगरे, शिवाजी रामभाऊ चालगे (हडको कॉर्नर), शेख भिकन शेख रहीम (रहेमानिया कॉलनी), सोमनाथ साहेबराव श्रीरंग (मिल कॉर्नर), संदीप काशीनाथ बोराडे (चिकलठाणा), रियाज मुसा शेख (बीड बायपास), समीर रहीम शेख (आझाद चौक), राजेश किशन विशिष्ट (बेगमपुरा), नवीन श्यामलाल बशरकर (आलमगीर कॉलनी), शेख राजमोहंमद जमीर शेख (चितेगाव) हे पत्यावर पैसे लावून जुगार खेळतांना मिळून आले.

पोलिसांनी जुगाऱ्यांच्या ताब्यातून 1 लाख 68 हजार रुपये रोख, एक चारचाकी, सहा दुचाकी, मोबाईल आणि जुगाराचे साहित्य असा 12 लाख 63 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी 24 जुगाऱ्यांना अटक करून त्यांच्याविरुद्ध जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक संजय सहाणे, सहाय्यक निरीक्षक सिद्धेश्वर गोरे, रघुवीर मुराडे, पोलिस अंमलदार किशोर राजपूत, शेख शेरू, रामसिंग सुलाने, ईश्वर जारवाल, कैलास राठोड, अनिल शिंदे, इलियास शेख, पांढरे, तामखने, शेजूळ, करताडे, जोनवाल आदींच्या पथकाने केली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow