गांजाचा साठा करुन विक्री करणारा गजाआड, 29 किलो गांजा जप्त...

गांजाचा साठा करुन विक्री करणारा गजाआड...
29 किलो 334 ग्रॅम गांजा जप्त
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.30(डि-24 न्यूज) -
अवैधरित्या गांजाचा साठा करुन विक्री करणाऱ्यास सातारा पोलिसांनी सापळा रचून गजाआड केले. या कारवाईत पोलिसांनी 5 लाख 92 हजार 80 रुपये किंमतीचा 29 किलो 334 ग्रॅम गांजा, एक दुचाकी असा एकूण 6 लाख 7 हजार 80 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती सातारा पोलिस ठाण्याचे निरीक्षक कृष्णा शिंदे यांनी शनिवार, 30 ऑगस्ट रोजी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लहु कडूबा मोरे (25 वर्ष), रा. सिंदोण असे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपीचे नाव आहे. परमेश्वरानंद उर्फ गोट्या दहिहांडे असे फरार आरोपीचे नाव आहे. सातारा परिसरातील अहिल्याबाई होळकर चौकात एक जण दुचाकीवर गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिस उपायुक्त प्रशांत स्वामी, उस्मानपूरा विभागाचे सहाय्यक आयुक्त मनिष कल्याणकर, सातारा पोलिस ठाण्याचे निरीक्षक कृष्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक शैलेंद्र देशमुख, गोविंद एकिलवाले, निर्मला राख, दिलीप बचाटे, उपनिरीक्षक नंदकुमार भंडारे, सहाय्यक फौजदार अण्णासाहेब सातदिवे, पोलिस अंमलदार जगदिश खंडाळकर, दिगंबर राठोड, महेश गोले, पुरुषोत्तम दायमा, सुनिल बेलकर, हमिद पठाण, दिपक शिंदे, दिनेश भुरेवाल, संदिप चिंचोले, सुनिल पवार, गंगाधर धनवटे अविनाश कवाळे आदींच्या पथकाने सापळा रचून लहु मोरे याला अहिल्याबाई होळकर चौकातून ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने सदरील गांजाचा साठा गेवराई ब्रुद्रक परिसरातील नगदेश्वर गड, महादेव मंदिर जवळून आणला असल्याची कबूली दिली.
पोलिसांनी गेवराई बुद्रक परिसरातील नगदेश्वर गड येथे छापा मारुन दोन गोण्यात भरुन ठेवलेला गांजा जप्त केला. चौकशीरदरम्यान गांजाचा हा साठा परमेश्वरानंद उर्फ गोट्या दहिहांडे याचा असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी गांजाचा साठा करुन विक्री करणाऱ्या लहु मोरे, परमेश्वरानंद उर्फ गोट्या दहिहांडे यांच्याविरुध्द सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
What's Your Reaction?






