अनधिकृत नळ कनेक्शन देणा-या प्लंबर विरोधात जीन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

 0
अनधिकृत नळ कनेक्शन देणा-या प्लंबर विरोधात जीन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

अनाधिकृत प्लंबर वरती गुन्हा दाखल...

मुजीब कॉलनी येथील अनाधिकृत नळ कनेक्शन खंडित...

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.16(डि-24 न्यूज)

मुजीब कॉलनी येथे अनधिकृत रित्या नळ कनेक्शन देणाऱ्या अनाधिकृत प्लंबर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 याबाबत प्राप्तवृत्त असे की

 दि.१३/०२/२०२५, मा. आयुक्त तथा प्रशासक, जी. श्रीकांत यांच्या कडे आलेल्या तक्रारीनुसार मोहल्ला मुजीब कॉलनी, कटकट गेट मुख्य पंपिंग जलवाहिनी वर अनधिकृत नळ कनेक्शन काही लोक घेत असल्याचे कळाले.

या नुसार दि. १३/०२/२०२५ रोजी संध्याकाळी ७:३० च्या सुमारास मुख्य पंपिंग जलवाहिनी वरून काही लोकांना अनधिकृत नळ कनेक्शन देत असल्याची तक्रार विशेष पथकाकडे कार्यकारी अभियंता के. एम. फलक यांनी पाठवली.

सदर प्राप्त तक्रारीची तत्काळ 

दखल घेत सदरील ठिकाणी पथक अभियंता रोहित इंगळे, सदरील विभागाचे वितरण कनिष्ठ अभियंता आनंद राजपूत, अक्षय डूकले, अनधिकृत पथकाचे तुषार पोटपिल्लेवार, सागर डीघोळे, तमिज पठाण, वैभव भटकर आणि स्वप्निल पायकडे सोबत लाईनमन मो. जुनेद मो. ताहीर घटनास्थळी पोहोचल्यानंतर एक इसम दोन नळ जोडण्या करत असल्याचे दिसून आला.

त्याला विचारणा केली असता त्याने त्याचे नाव सत्तार असल्याचे सांगितले नंतर असे लक्षात आले की हा सत्तार शेख नामक इसम हा विनापरवाना प्लंबर असून तो मागील काही दिवसांपासून पासून अनधिकृत नळ कनेक्शन देत असल्याच्या तक्रारी कार्यकारी अभियंता/अनधिकृत पथकाकडे प्राप्त होत होत्या परंतु हा प्लंबर सापडत नव्हता पण वेळेवर प्राप्त झालेल्या तक्रारी मुळे हा रंगेहाथ कनेक्शन देत असताना पकडलां गेला.सदरील ठिकाणांहून जवळपास ४० ते ५० फूट पाईप जप्त करण्यात आले.

 सदरील अनधिकृत नळ कनेक्शन देणाऱ्या विनापरवाना प्लंबर विरुद्ध आयुक्त महोदय यांच्या आदेशानुसार जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow