डॉ.झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेसाठी 22 फेब्रुवारी पर्यंत मागवले प्रस्ताव
![डॉ.झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेसाठी 22 फेब्रुवारी पर्यंत मागवले प्रस्ताव](https://d24news.in/uploads/images/202502/image_870x_67a4a500b87f2.jpg)
डॉ.झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना;प्रस्ताव मागविले
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि.17(डि-24 न्यूज) – अल्पसंख्याक विकास विभागातर्फे डॉ.झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना राबविण्यात येते. या योजनेंतर्गत अनुदान मिळवू इच्छिणाऱ्या मदरसांनी दि.22 पर्यंत आपले प्रस्ताव सादर करावे असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ यांनी केले आहे. प्रस्ताव दाखल करण्याकरीता योजनेचा शासन निर्णय व आवश्यक कागदपत्रांची यादी https://mdd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुक व पात्र मदरसा चालकांनी मदरसांचे परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय येथे दि.22 पर्यंत सादर करावे, विहित मुदतीनंतर प्राप्त झालेले प्रस्ताव स्विकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ यांनी केले आहे.
What's Your Reaction?
![like](https://d24news.in/assets/img/reactions/like.png)
![dislike](https://d24news.in/assets/img/reactions/dislike.png)
![love](https://d24news.in/assets/img/reactions/love.png)
![funny](https://d24news.in/assets/img/reactions/funny.png)
![angry](https://d24news.in/assets/img/reactions/angry.png)
![sad](https://d24news.in/assets/img/reactions/sad.png)
![wow](https://d24news.in/assets/img/reactions/wow.png)