बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचा विद्यापीठ परिसरात राडा, लाठ्या काठ्या हातात घेऊन इंट्रीने घाबरले विद्यार्थी
बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचा हातात लाठ्या काठ्या घेऊन विद्यापीठात धुडगूस, व्हॅलेंटाईन विरोधी मोहीम, आंबेडकरी चळवळीच्या विद्यार्थ्यांनी केला त्यांच्या विरोधात आंदोलन, अशी दादागिरी खपवून घेणार नाही असा दिला इशारा...कुलगुरूंचा विद्यार्थ्यांना बोलण्यास नकार... पोलिसांना घटनेची माहिती मिळताच धाव... परिस्थितीचा घेत आहे आढावा काय घटना घडली यांची माहिती घेतली जात आहे...आंदोलक विद्यार्थ्यांचे ऐकून घेण्याची मागणी....
औरंगाबाद, दि.14(डि-24 न्यूज) डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परिसरात भगवे रुमाल गळ्यात घालून हातात लाठ्या काठ्या घेऊन, जय श्रीरामाच्या घोषणा देत प्रवेश करत विद्यार्थ्यांना हुसकावून लावले. विद्यार्थी व विद्यार्थीनी घाबरून सैरा वैरा पळू लागले. हे कार्यकर्ते बजरंग दलाचे असल्याचा दावा आंबेडकरी चळवळीच्या विद्यार्थ्यांनी केला आहे. त्यांनी यांना समजावून सांगितले हि दादागिरी येथे चालणार नाही येथून निघून जा विद्यार्थ्यांना त्रास देऊ नका. काही विद्यार्थी गार्डन परिसरातील नारळी बागेत अभ्यास करत होते तर काही गप्पा मारत बसले असताना हातात लाठ्या काठ्या घेऊन सिने स्टाईलने भगवेधारी रुमाल गळ्यात घालून व्हॅलेंटाईन डे चा विरोध करण्यासाठी अचानक विद्यापीठात धुडगूस घालने यामुळे विद्यार्थी घाबरले. दुपारी अडीच वाजेच्या दरम्यान हि घटना घडली. रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे सचिन निकम यांनी डावे विद्यार्थी आघाडी व आंबेडकरी विद्यार्थी संघटनांनी त्यांचा विरोध केला. निकम यांनी सांगितले ते विद्यार्थ्यांना धमकावत होते. या घटनेने विद्यापीठ परिसरात दहशत निर्माण झाली. यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. येथे विद्यार्थी ग्रामीण भागातून शिक्षणासाठी घर सोडून येतात त्यांच्या जीवाचे काय असा प्रश्न विद्यापीठ प्रशासनाला सचिन निकम यांनी विचारला आहे. यावेळी कुलगुरू उपस्थित नव्हते. या टोळक्यात हर्षवर्धन केनेकर, प्रविण बिरुटे, सुमित चोरडिया, अक्षय कालडा, रवीरंजन उपाध्याय, अजय जडे, रूपेश लव्हेरा यांच्यासह 40 ते 50 जण तोंडाला भगवे फडके , हातात लाठ्या काठ्या, जय श्रीरामाच्या घोषणा देत होते अशी माहिती डि-24 न्यूजला सचिन निकम यांनी दिली आहे. यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी केली आहे.
बजरंग दलाचे कार्यकर्ते विद्यार्थ्यांना त्रास देत असल्याचे कळाल्यानंतर काही कार्यकर्ते तेथे धावले. एनएसयुआय, रिपब्लिकन बहुजन सेनेच्या कार्यकर्त्यांनी धाव घेत जोरदार घोषणाबाजी करुन धुडगूस घालणा-या टोळक्याला हाकलून लावले. विद्यापीठात अशा प्रकारे दादागिरी चालणार नाही असा इशारा देत विद्यार्थ्यांनी निदर्शने केली.
What's Your Reaction?