माॅल आणि बाजारपेठेत बचत गटांनी तयार केलेल्या वास्तूचे विक्री स्टाॅल उभारावेत - जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

मॉल आणि बाजारपेठेत बचत गटांनी तयार केलेल्या वास्तूचे विक्री स्टॉल उभारावेत_ जिल्हाधिकारी दिलीप स्वामी छत्रपती संभाजीनगर
(औरंगाबाद),दि. 13 (डि-24 न्यूज)- जिल्ह्यातील महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत स्थापन केलेल्या बचत गट आणि जिल्हा परिषदेच्या उमेद स्वयंसहायता बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे विक्री स्टॉलची मॉल , बाजारपेठेत उभारावेत महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणास पुढाकार घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज येथे केले.
महिला आर्थिक विकास महामंडळच्या जिल्हा कार्यक्रम सल्लागार समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयातील संपन्न झाली. या बैठकीसाठी जिल्हा रोजगार आणि स्वयंरोजगार विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री वाकुडे ,महिला बालविकास विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मंगल पांचाळ जिल्हा उद्योग केंद्र ,जिल्हा अग्रणी बँकेचे प्रतिनिधी, महिला आर्थिक विकास, महामंडळाचे जिल्हा समन्वयक चंदनसिंग राठोड, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा उमेदचे जिल्हा समन्वयक विक्रम सरगर उपस्थीत होते.
महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत विविध उपक्रमाचे सादरीकरण जिल्हा समन्वयक चंदन सिंग राठोड यांनी बैठकीसमोर केले .यामध्ये महिलांचे हिमोग्लोबिन तपासणी, परसबाग उपक्रम , कुपोषण निर्मूलन मोहीमवर भर देणे या विषयी माहिती देण्यात आली. 2025 या आर्थिक वर्षाच्या कर्जाचे उद्दिष्ट येत्या डिसेंबर पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले
दिवाळीनिमित्त बचत गटातील महिलांनी प्रोझोन सारख्या विविध गर्दीच्या ठिकाणी आपले स्टॉल लावून तयार केलेले वास्तूचे विक्री करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन द्यावे असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी उमेद आणि महिला आर्थिक विकास महामंडळाच्या संबंधितांना दिले.
What's Your Reaction?






