ईव्हिएम विरोधात 39 दिवसांपासून आंदोलन सुरू, ईव्हिएमचे करणार दहन...!

ईव्हिएम विरोधात 39 दिवसांपासून आंदोलन सुरू, ईव्हिएमचे करणार दहन...!
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.8(डि-24 न्यूज) विभागीय आयुक्त कार्यालयासमोर ईव्हिएम विरोधात मागिल 39 दिवसांपासून बेमुदत साखळी आंदोलन सुरू आहे. कारवाई होत नसल्याने हे आंदोलन आता तीव्र करणार आहे. 10 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता ईव्हिएम प्रतिकृतीचे दहन करण्यात येणार आहे. या आंदोलनात विविध पक्ष संघटनांच्या नेतेही उपस्थित राहणार आहेत अशी माहिती पत्रकार परिषदेत आंदोलक पंडित गायकवाड यांनी दिली आहे. याप्रसंगी अशोक जायभाये, नाजिम काझी, सुरेश चव्हाण, राजेश्री देबाजी यांची उपस्थिती होती.
आंदोलकांची मागणी आहे देशातील सर्व निवडणुका फ्री अँड फेअर वातावरणात व्हावेत म्हणून इलेक्ट्रीक व्होटिंग मशिन(EVM) हटवून बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची मागणी आहे.
What's Your Reaction?






