समाजात भाईचारा, एकता निर्माण करण्यासाठी देशभरात मोहीम - मौलाना सज्जाद नोमानी

समाजात भाईचारा, एकता निर्माण करण्यासाठी देशभरात मोहीम - मौलाना सज्जाद नोमानी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.20(डि-24 न्यूज) देशात व राज्यात समाजात तेढ निर्माण करुन सत्तेवर येण्यासाठी निवडणुकीत याचा फायदा होईल असे प्रयत्न केले जात आहे. देश महाशक्ती बनण्यासाठी संसाधणे, वैज्ञानिक दृष्टिकोन, युवकांची शक्ती आपल्याकडे आहे. परंतु समाजाला दिशा न देता काही राजकीय पक्ष आपल्या स्वार्थाचे राजकारण करत आहे. माझा राजकारणाशी संबंध नाही परंतु समाजात अंतर वाढत आहे ते अंतर कमी व्हावे म्हणून देशात व राज्यात भाईचारा कायम राहावे व एकतेचा आणि मानवतेचा संदेश देशवासीयांना देण्यासाठी मोहिम सुरू केली आहे. सामाजिक व धार्मिक संघटनांशी संवाद साधला जात आहे. विविध जात व समुहात कटुता संपली पाहीजे. मराठा व मुस्लिम समाजाचे नाते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून चालत आलेले आहे. मुस्लिम समाजाबद्दल द्वेष पसरवला जात आहे. माॅब्लिंचिंग व बुलडोझर पाॅलिटिक्स केली जात आहे. महाराष्ट्रात मोठ्या संख्येने मराठा समाज आहे. मनोज जरांगे पाटील आपल्या समाजाच्या हितासाठी काम करत आहे. सध्या राज्यात विधानसभा निवडणुक आहे. मराठा, दलित, मुस्लिम एकजूट निर्माण झाल्यास राज्यात जे तेढ निर्माण करणारी शक्ती आहे त्याला कमकुवत करण्याची गरज आहे. मनोज जरांगे पाटील हे मला भेटायला आले होते. समाजात भाईचारा निर्माण व्हावा यासाठी एकतेची गरज आहे यामुळे देश प्रगतीपथावर जाईल. माझा हेतू हाच आहे. ज्या समाजावर अन्याय होत आहे त्यांना न्याय मिळाला पाहिजे. यासाठी या निवडणुकीत जागृत होत काम करण्याची गरज आहे. जसे हरियाणात घडले तसे या राज्यात परिस्थिती निर्माण होऊ नये. महाराष्ट्राची प्रगती होईल यासाठी जरांगे यांच्या सोबत चर्चा झाली. माझे राजकारणाशी संबंध नाही फक्त मानवतेसाठी काम करत आहे. सन 2014 मध्ये देशात सत्तांतर झाले ते हिंदूत्वाच्या मुद्द्यांवर नाही तर प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख येतील, दरवर्षी दोन कोटी नोकरी, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल या आश्वासनावर आले होते परंतु आश्वासन पाळले गेले का...? अशी माहिती माध्यमांना मुस्लिम धर्मगुरु सज्जाद नोमानी यांनी जरांगेंशी झालेल्या संवादाची माहिती दिली.
What's Your Reaction?






