देशातील सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याच्या मागणीसाठी नागरीक रस्त्यावर

 0
देशातील सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याच्या मागणीसाठी नागरीक रस्त्यावर

देशातील सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याच्या मागणीसाठी नागरीक रस्त्यावर

औरंगाबाद, दि.23(डि-24 न्यूज) देशातील सर्व निवडणुका ईव्हीएमवर आणि व्हिव्हि पॅटवर न घेता बॅलेट पेपरवर घ्यावे या मागणीसाठी भारतीय क्रांती दलाच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

शिष्टमंडळाच्या वतीने विभागीय आयुक्त यांचे मार्फत राष्ट्रीय निवडणूक आयोग, दिल्ली यांना निवेदन सादर केले.

निवेदनात म्हटले आहे एक घटनात्मक नैतिक कर्तव्याने भारतीय संविधान अनुच्छेद क्रं.19(क) च्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यानुसार जो मुलभूत अधिकार दिलेला आहे. त्यानुसार भारतीय क्रांती दलाच्या वतीने सर्व देशवासीयांच्या वतीने हे आवाहन आहे. येणाऱ्या सन 2023 च्या सर्व निवडणुका ईव्हीएमवर व व्हि.व्हि.पॅटवर न घेता बॅलेट पेपरवर घेण्यात यावे अशी मागणी केली आहे.

यावेळी भाई शैलेंद्र मिसाळ, रमेशदादा साळवे, मच्छिंद्रनाथ ढेपे, मिर्झा शफीक बेग, गणेश निंभोरे, ज्ञानेश्वर गायकवाड, चंद्रकांत मगरे, विक्रम जावळे, अजीम पटेल, दिपक भालेराव, सतिश भालेराव, विलास भालेराव, रामदास करडेल, गौतम पठारे, सुनील बोर्डे, उत्तम बनकर, श्रीमंत उगले, अजय घागरे आदी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow