कटकट गेट मध्ये पाण्यासाठी वणवण, अकरा दिवस झाले तरीही नळाला पाणी नाही
कटकट गेट मध्ये पाण्यासाठी वणवण, अकरा दिवस झाले तरीही नळाला पाणी नाही, शहरातील अनेक वार्डात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे....बाबर काॅलनी आणि नाहिदनगर येथील नागरीक सुध्दा पाण्यासाठी त्रस्त झाले आहेत.... स्मार्ट सिटी तहानलेलीच...
औरंगाबाद, दि.26(डि-24 न्यूज) महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे वेळापत्रक कोलमडले आहे. कटकट गेट नेहरुनगर वार्डात अकरा दिवस झाले तरीही नळाला पाणी आले नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. तापमान 44 डिग्री पर्यंत गेले आहे. एकीकडे उन्हाचा तडाखा दुसरीकडे पिण्यासाठी व वापरण्यासाठी पाणी नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. अगोदर सहा सात दिवसाआड पाणी येत असे जसजसा उन वाढत आहे दहा ते बारा दिवसाआड पाणी येत असल्याचे येथील नागरिकांनी डि-24 न्यूजला सांगितले. पाण्याचे जार वीस रुपयांत खरेदी करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. एमआयएमचे सलिम सहारा यांनी मनपाच्या पाणीपुरवठा विभागाशी संपर्क करुन पिण्यासाठी टँकर मागवले तर पाण्यासाठी झुंबड उडत आहे. पाणीपुरवठा पूर्ववत करावा अशी मागणी येथील नागरीक करत आहे.
What's Your Reaction?