औरंगाबाद विभागाचा दहावीचा निकाल 95.19%, 840 शाळांचा शंभर टक्के लागला निकाल
विभागाचा दहावीचा निकाल 95.19, 840 शाळांचा शंभर टक्के तर पाच शाळा शुन्यावर...
औरंगाबाद, दि.27(डि-24 न्यूज) औरंगाबाद विभागाचा दहावीचा निकाल 95.19%, औरंगाबाद 95.51, बीड 97.40, परभणी 93.03, जालना 94.99, हिंगोली 92.22 टक्के लागला आहे.
विभागात 840 शाळांचा रिझल्ट 100%, परभणीचे पाच शाळांचा निकाल 0 टक्के, औरंगाबादचे 306, बीड 263, परभणी 102, जालना 123, हिंगोली 66 शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. अशी माहिती विभागीय मंडळाचे प्र.अध्यक्ष अनिल साबळे, सचिव डॉ वैशाली जमादार यांनी दिली आहे.
विभागात 184253 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली प्रविष्ट 182244, उत्तीर्ण 174056 झाले. पुनर्रपरीक्षार्थी 60.38 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यावेळीही निकालात मुलींनी बाजी मारली. 97.18 टक्के मुली तर 94.17 टक्के मुले उत्तीर्ण झाले. मुलांच्या तुलनेत मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण 3.30 अधिक आहे.
प्राविण्य श्रेणीत औरंगाबादचे 27644, प्रथमश्रेणी 21617, द्वीतीय 11117, बीड 24004, 11497, 4325, परभणी 9183, 8889, 6109
जालना 13914, 9709, 5430, हिंगोली 4562, 5132, 3811 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
विभागात एकूण 149 गैरमार्ग प्रकरणी चौकशीची प्रक्रिया पूर्ण झालेली असून संबंधित विषयांची संपादणूक रद्द - 19, परीक्षोत्तर - 42, एकूण 61.
परीक्षार्थी निर्दोष निकाल जाहीर - परीक्षा पूर्व- 68, परीक्षोत्तर 20, एकूण 88.
गुणपडताळणी, व उत्तरपत्रिकांच्या छायांकीत प्रत, पुनर्मूल्यांकन करण्यासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळ https://verification.mh.ssc.ac.in किंवा शाळांमार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.
दिनांक 28 मे 2024 ते 11 जूनपर्यंत अर्ज विद्यार्थ्यांना करता येईल. अशी माहिती विभागीय मंडळाच्या वतीने देण्यात आ
ली आहे.
What's Your Reaction?