शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा परिसर स्वच्छ करून शिवसैनिकांनी केले अभिवादन...

 0
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा परिसर स्वच्छ करून शिवसैनिकांनी केले अभिवादन...

शिवसेनेच्या वतीने अमरप्रीत चौक येथे शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.16(डि-24 न्यूज)- 17 नोव्हेंबर रोजी मराठी अस्मितेचे मानबिंदू , तमाम शिवसैनिकांचे दैवत हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन. या स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला आज (16 नोव्हेंबर) शिवसेनेच्या वतीने अमरप्रीत चौक येथील बाळासाहेबांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले.

सर्वप्रथम युवासेना महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य हर्षदाताई संजय शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी श्रीमान बाळासाहेबांचा पुतळा तसेच परिसर पाण्याने स्वच्छ धुवून काढण्यात आला. या नंतर श्रीमान बाळासाहेबांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 

याप्रसंगी शहरप्रमुख विजय वाघचौरे, उपजिल्हाप्रमुख प्रा.संतोष बोर्डे, राजेंद्र राठोड, रमेश बाहुले , गजानन मनगटे, महिला आघाडी संपर्क प्रमुख प्रतिभाताई जगताप, उपशहरप्रमुख सुधीर चौधरी, गणेश जाधव, अनिल बिरारे, रणजीत ढेपे, प्रसिद्धीप्रमुख अभिजीत पगारे, शिवा हिवाळे राजू राजपूत , सतीश निकम ,युवासेना समन्वयक सागर वाघचौरे , रमेश इधाटे, विभागप्रमुख संदीप आरके, साईनाथ वाहूळ, नंदकुमार उढान ,संतोष जाटवे , बंटी सोनवणे , महेश सूर्यवंशी, सचिन घाटे, रविराज गौर शेट्टी, नितीन साळवे शाखाप्रमुख, धनराज जी मांडवे संतोष राठोड विनोद मोटे शिव भुंबक, समीर शेख, किरण शिंदे शाखाप्रमुख, विनोद घोडके उपशाखाप्रमुख , मिलिंद बनकर, धम्मा काळे, अनिल कोळी, बाळू मुंदवाडकर आदी शिवसैनिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित हो

ते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow