EVM विरोधात सुरू असलेले बेमुदत साखळी उपोषणाचा 50 व्या दिवशी समारोप...!

EVM विरोधात सुरू असलेले बेमुदत साखळी उपोषणाचा 50 व्या दिवशी समारोप...
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.19(डि-24 न्यूज) प्रतीकात्मक होमहवन करून, सरकार आणि निवडणूक आयोगाने 50 दिवसात लक्ष न दिल्याने दुर्लक्ष्यचंडी यज्ञात EVM ची प्रतिकृती जाळण्यात आली. जोरदार घोषणाबाजी करीत, प्रतीकात्मक मंत्र म्हणत, ही EVM ची प्रतिकात्मक पत्र जाळण्यात आली. आम्ही भारतीय लोक... या बॅनरखाली सुरू असलेल्या 'EVM हटाव संविधान बचाव' बेमुदत साखळी उपोषण आंदोलनाचा 50 व्या दिवशी समारोप करण्यात आला. 1 जानेवारी, भीमा कोरेगाव शौर्यदिन ते 19 फेब्रुवारी शिवजयंतीदिनी पर्यंत हे आंदोलन चालले. प्रतीकात्मक होमहवन करून त्यात EVM ची आहुती देऊन हे आंदोलन थांबविण्यात आल्याची माहीती पंडित गायकवाड यांनी दिली. होमहवन, यज्ञ हे प्रतीकात्मक करण्याचे कारण म्हणजे सध्याच्या राज्यकर्त्यांना व प्रशासनातील मनुवादी लोकांना संवैधानिक मार्गाने, लोकशाही पद्धतीने करण्यात येणारे आंदोलन समजत नाही. यासाठी त्यांना ज्या पद्धतीने समजते, जे जास्त लवकर कळते त्याच धार्मिक प्रतीकांचा आधार घेऊन अर्थात धार्मिक अवडंबावर व्यंगात्मक प्रहार करून हे आंदोलन थांबविण्यात येत असल्याचे ते म्हणाले. या आंदोलनाची सांगता करण्यात येईल. 1 जानेवारी भीमा कोरेगाव शौर्य दिनापासून ते स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनापर्यंत 50 दिवस हे आंदोलन चालले. यावेळी मधुकर भोळे, चुन्नीलाल जाधव, राजू भालेराव, नरहरी कांबळे, सुरेश चव्हाण, अशोक जायभाय, अक्षय भुंबे, दिमंत राष्ट्रपाल, नजीम काझी, मीना वानखेडे ताई, निर्मला गवई ताई, ठोके ताई, नंदा ताई बनकर. बनकर ताई, राजश्री देबाजे, शिवप्रसाद तुरे पाटील, देवेंद्र गवई, रवी दाभाडे, अशोक मोरे, जीवन शास्त्री, नंदू गायकवाड आदींची उपस्थिती होती.
What's Your Reaction?






