काँग्रेसच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी...!

शहर व जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे लोककल्याणकारी शासनकर्ते छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी...
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.19(डि-24 न्यूज)
जनतेच्या मनात स्वाभिमान जागृत करणारे, रयतेच्या राज्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरवणारे लोककल्याणकारी शासनकर्ते छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंती दिनी शहर व जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे क्रांतीचौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुर्णाकृती पुतळ्यास खा.डॉ. कल्याण काळे, शहर जिल्हाध्यक्ष शेख युुसूफ यांच्या नेतृत्वाखाली पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
शिवरायांनी निर्माण केलेले हिंदवी स्वराज्य म्हणजे मानवी इतिहासातील सुवर्णकाळ होय. त्यांनी प्रत्येक जाती, धर्म, विविधतेचा नेहमीच आदर केला. त्यांचा आदर्श असंख्य पिढ्यांना प्रेरणा देत राहील असे विचार यावेळी व्यक्त करण्यात आले.
यावेळी खा.डॉ. कल्याण काळे, शहर जिल्हाध्यक्ष शेख युुसूफ, जगन्नाथ काळे, रविंद्र काळे, भाऊसाहेब जगताप, सरचिटणीस इंजि. विशाल बन्सवाल, राहुल सावंत, कैसर बाबा, उमाकांत खोतकर, अशोक डोळस, शफिक शहा, बाबुराव कवसकर, संदिपराव बोरसे, बाबासाहेब बोरचटे, अंकुशराव चौधरी, कल्याण चव्हाण, प्रकाश सानप, प्रकाश खोतकर, योगेश थोरात, पप्पूराज ठुबे, प्रमोद सदाशिवे, सुनिल साळवे, रऊफ देशमुख, विनायक सरवदे, अनिताताई भंडारी, चंद्रप्रभा खंदारे, शकुंतला साबळे, सिमा मदने, इंदुताई खरात, यशिता भंडारी, मनोज शेजूळ, रमेश काळे, नायबराव दाभाडे, अस्मत खान यांच्यासह मोठ्या प्रमाणावर काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
What's Your Reaction?






