भारतीय दलित पॅंथरच्या वतीने शिवजयंती साजरी...!

भारतीय दलित पॅंथरच्या वतीने शिवजयंती साजरी....
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.19(डि-24 न्यूज)
भारतीय दलीत पँथरच्या वतीने रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनी सिडको N -7 येथे अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्रा. प्रकाश सोनवणे लक्ष्मण भुतकर यांनी शिवाजी महाराजानच्या जीवनावर विचारमंथन केले ते म्हणाले की रयतेच्या राजांनी मोठ मोठे गड किल्ले जिंकले परंतु आज त्यांच्या किल्ल्याचे संरक्षण करणारे खरे मावळे आज बाजूला राहत आहेत यांची खंत वाटते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिनी सर्वांनी एकत्रित येऊन महाराजांच्या किल्याला कोन्हालाही सुरुंग लावू देऊ नका व त्यांचे विचार आत्मसात करा असे आवाहन पँथर नेते लक्ष्मण भुतकर यानी केले.
यावेळी पँथर नेते लक्ष्मण भुतकर, प्रकाश सोनवणे, दशरथ कांबळे, प्रकश पवार, संजय सरोदे, ऍड सतीश राऊत, धम्मपाल दांडगे, समाधान कस्तुरे, अहमद पठाण, रामदास पगडे, दिलीप पवार, उत्तम डोंगरे, शामलाल भगुरे, राजकुमार कांबळे, योगेश जुमडे, असदोद्दीन पठाण, वामन गायकवाड सह मोठ्या संख्येने पॅंथर कार्यकर्ते उपस्थित होते.
What's Your Reaction?






