40 वर्षांनंतर भेटले शालेय विद्यार्थी, निमित्त होते शाळेला 60 वर्ष पूर्ण झाले...!

40 वर्षांनंतर भेटले शालेय विद्यार्थी, निमित्त होते शाळेला 60 वर्ष पूर्ण झाले...!
औरंगाबाद, दि.18(डि-24 न्यूज) शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपण आपल्या कामात रंगून जातो कोणी नोकरीवर तर कोणी उद्योग धंद्यात. शालेय जीवन विसरून जातो परंतु शहरातील एका शाळेला 60 वर्ष पूर्ण झाले म्हणून त्यानिमित्ताने संमेलनात 40 वर्षांनंतर शालेय विद्यार्थ्यांनी एकत्र येत लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या.
खडकेश्र्वर स्थित बाल ज्ञान मंदिर येथे या विद्यार्थ्यांनी सातवीपर्यंत शिक्षण घेतले. न्या.बलवंतराव घाटे सभागृहात हे संमेलन पार पडले. या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष राजमती सासवडे, उपाध्यक्ष सुजाता अवचट, सचिव अंजली टाकलकर, सहसचिव हेमा अहिरवाडकर, पूर्व मुख्याध्यापिका प्रतिक्षा पानसे, मुख्याध्यापक श्रीकांत वानोसकर, मुख्याध्यापक बालासाहेब चोपडे, सेवानिवृत्त शिक्षक यशोमती विश्वरुपे, सुप्रिया चौधरी, उषा एकमोडे, चारुशीला उगदे, स्नेहल कुलकर्णी, रेणूकादास देशमुख उपस्थित होते.
जुने विद्यार्थी विविध गांव व शहरातून सहभागी झाले.
जुने विद्यार्थी प्रमोद राठोड, अजय मंत्री, डॉ.सोनाली चोपडे, डॉ.धनंजय घुगे, सहायक पोलिस आयुक्त आरती जाधव, अनिकेत जोशी, एजाज खान सर, काळोसे, स्वप्निल कोर्टीकर, संजय मंत्री, श्रीरंग जोशी, भालकीकर यांनी मनोगत व्यक्त केले. दिपाली गाडेकर यांनी गीत गायन करत सर्वांना मंत्रमुग्ध केले. सचिन गोडसे यांनी मुक अभिनय करत हसवले. सुत्रसंचलन योगिता खैरनार यांनी केले तर प्रस्तावना पूर्व मुख्याध्यापिका प्रतिक्षा पानसे यांनी केली. रुपेश भालेराव यांच्या गीत गायनाने कार्यक्रमाचे समारोप झाले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिपाली वाडेकर, योगिता शेटे, अजय मंत्री, शांतीलाल सपाटे, विनोद खामगांव कर, राहुल गडकरी, अभिजित भालकीकर, पद्मनाथ चौधरी, संजय मंत्री, संजय ठोकळ, कालिदास तादलापूरकर, रवी तांबोळी, संध्या जाधव, अर्चना कुलकर्णी यांनी केले.
What's Your Reaction?






