खैरेंची हि शेवटची निवडणूक, स्वतः दिली कबुली, 22 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार

 0
खैरेंची हि शेवटची निवडणूक, स्वतः दिली कबुली, 22 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार

खैरेंची हि शेवटची निवडणूक, खैरेंची कबूली...

पाच वर्षांनंतर अंबादास दानवे असतील उमेदवार...

22 एप्रिल रोजी आदीत्य ठाकरे, नाना पटोले, खासदार इम्रान प्रतापगडी, अमित देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करणार, क्रांतीचौक ते संस्थान गणपती पर्यंत भव्य मिरवणूक निघणार...

औरंगाबाद, दि.18(डि-24 न्यूज) 22 एप्रिल रोजी क्रांतीचौक ते संस्थान गणपती पर्यंत भव्य मिरवणूक काढून युवा सेना प्रमुख तथा आमदार आदीत्य ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खासदार इम्रान प्रतापगडी, माजीमंत्री अमित देशमुख व महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. शिवसेनेचा मुकाबला एमआयएम शी आहे. इम्तियाज जलील व डॉ भागवत कराड यांना दिल्ली माहीत नाही अशी टिका शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी केली.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पाच वर्षांनंतर मीच उमेदवार असेल, असा दावा केला तर ही माझी शेवटची निवडणूक, असे चंद्रकांत खैरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

महाविकास आघाडीचे उमेदवार खैरे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी दानवे यांच्यासह महाविकास आघाडीतील पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. तुम्ही आतापर्यंत कोणती विकासकामे केली ? प्रचारातील मुद्दे काय ? यासह इतर प्रश्‍न विचारले गेले त्यावर दानवे यांनी खैरे यांची बाजू मांडण्यासाठी माइक हाती घेत खैरे यांनी कोणकोणती कामे केली, याची माहिती दिली. त्यावर पत्रकारांनी ‘तुम्हीच उमेदवार असल्याप्रमाणे उत्तरे देत आहात’, असा प्रश्‍न दानवे यांनी केला. त्यांनी ‘‘पुढच्या निवडणुकीत मीच उमेदवार असेन’’, असे जाहीर केले, तर खैरे यांनीही ‘‘माझी ही शेवटची निवडणूक असून, सर्वांची इच्छा असेल तर पाच वर्षांनंतर लोकसभा निवडणुकीसाठी अंबादास दानवे हेच उमेदवार असतील. पण, तो निर्णय पक्षप्रमुख घेतील’’, असे सांगत दानवे यांना पाठिंबा दिला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे, काँग्रेसचे शहराध्यक्ष युसुफ शेख, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष ख्वाजा शरफोद्दीन, कार्याध्यक्ष अभिषेक देशमुख, छावाचे शिवानंद भाणूसे, अशोक पटवर्धन, नंदकुमार घोडेले, विश्वजीत कदम, त्र्यंबक तुपे, सुनिता आऊलवार, काॅ.अभय टाकसाळ, काॅ.भिमराव बनसोडे, प्रसन्ना पाटील, विलास मगरे, शफीक शेख आदी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow