रमेश गायकवाडांचा कल महाविकास आघाडी, 30 एप्रिलला शहरात भव्य घटना बचाओ परिषद

 0
रमेश गायकवाडांचा कल महाविकास आघाडी, 30 एप्रिलला शहरात भव्य घटना बचाओ परिषद

रमेश गायकवाडांचा कल महाविकास आघाडी, 30 एप्रिलला घटना परिषद

औरंगाबाद, दि.18(डि-24 न्यूज) लोकसभा निवडणुकीत मराठवाडा बहुजन विकास आघाडीचा पाठिंबा महाविकास आघाडीला असणार असे असे संकेत पत्रकार परिषदेत मराठवाडा बहुजन विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश गायकवाड यांनी दिले आहे. भारतीय राज्यघटना बदलण्याचे कटकारस्थान करुन देशातील अनु.जाती, अनु.जमाती, ओबीसी, अल्पसंख्याक मुस्लिमांना बेदखल करण्याचे काम करत असल्याने केंद्रातील सत्तेवरून खेचण्यासाठी लोकसभेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर 30 एप्रिल 2024 रोजी, औरंगाबाद येथील काल्डा काॅर्नर येथील मैदानावर सायंकाळी सहा वाजता संविधान वादी सर्व घटक पक्षांच्या उपस्थितीत भव्य घटना बचाओ परिषदेचे आयोजन करण्यात आली आहे. औरंगाबाद व जालना लोकसभा मतदारसंघातील मतदार या परिषदेला येणार आहे. मुख्य अतिथी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे नेते तथा खासदार संजय राऊत यांना निमंत्रण पाठवले आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत रमेश गायकवाड यांनी दिली आहे.

यावेळी माजी नगरसेवक कैलास गायकवाड, जायभाये, प्रकाश निकम, सागर बागूल, सनद गायकवाड आदी उपस्थित होते.

त्यांनी पत्रकार परिषदेत भाजपा वर आरोप लावला की ईव्हीएमद्वारे बहुमत घेऊन भारतात अध्यक्षीय लोकशाही आणून विरोधी पक्षाला संपवून चातूवर्ण व्यवस्था आणुन समाजवादी विचार भारतातून संपविण्याचा डाव भाजपा व आरएसएसने आखला आहे. मराठवाड्यातील हक्काचे पाणी व तूट, 1975 नंतर मराठवाड्यात एकही जलप्रकल्प आला नाही. नापिकी व कर्जबाजारीपणामुळे 1975 ते 2023 पर्यंत मराठवाड्यातील 60 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. अहमदनगर व नाशिकने पाळवलेले 50 टिएमसी पाणी, कृष्णा खो-याचे 23 टिएमसी मध्य गोदावरीचे 19.32 टिएमसी , कालवे नसलेले 50 टिएमसी असे एकूण 143 टिएमसी हक्काचे पाणी देण्याबाबत महायुतीचे लोक बोलत नसल्याने दररोज 5 शेतकरी मरणाला कवटाळतात. जालना, औरंगाबाद, बीड, परभणी या दोन्ही पैठण डावा व उजवा कालव्याचे पाणी कमी करुन गंगापूर सारखी मारक योजना राज्याचे जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणली असून यामध्ये अर्ध्या मराठवाड्याच्या शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे. शेतीमालाला भाव मिळत नाही, शेतकरी आत्महत्या करत आहे. महागाई बेरोजगारी वाढत आहे. NRC, CAA हे कायदे अल्पसंख्याकांना धमकावण्यासाठी आणले आहे. केंद्र सरकारने हे कायदे मुस्लिमांना नागरिकत्व न देण्यासाठी काढला की धमकावण्यासाठी असा प्रश्न गायकवाड यांनी उपस्थित केला. ओबीसी जनगणना व राजकीय आरक्षणावर सत्ताधारी भाजपाची भुमिका काय, भाजपाने आपल्या जाहिरनाम्यात ओबीसी जातीनिहाय जनगणना, आरक्षण मर्यादा वाढविण्यावर उल्लेख केला नाही असे अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow