वक्फ मंडळाची यंत्रणा सक्षम करुन झिरो पेंडेंसी वर भर देणार - समीर काझी
वक्फ मंडळाची यंत्रणा सक्षम करून "झिरो पेंडंसी वर भर देणार- अध्यक्ष समीर काझी यांचे प्रतिपादन
छ.संभाजीनगर(औरंगाबाद)दि.1(डि-24 न्यूज) महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळात 60 रिक्त जागा भरल्या नंतर बोर्डाची प्रशासकीय यंत्रणा मजबूत करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने गतिमान प्रशासन राबविण्याचा आमचा संकल्प आहे. त्यामुळे आम्ही "झिरो पेंडंसी" वर भर देऊन लोकांना तत्परतेने न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहोत. असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे अध्यक्ष समीर काझी यांनी व्यक्त केले.
शहरात दोन दिवसीय बैठक आयोजित करण्यात आली होती. मंडळाचे दोन नवीन सदस्य ऍड.इफतेखार हाश्मी व ऍड.एयु पठाण यांनी पहिल्यांदाच बैठकीत हजेरी लावली. याप्रसंगी अध्यक्षांनी दोघांचा सत्कार केला. यावेळी अध्यक्षांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच 12 सप्टेंबर रोजी डॉक्टर मुदसीर लांबे यांचा सदस्यत्वाचा कालावधी संपणार आहे. त्यांना शाल श्रीफळ देऊन सर्व सदस्य व कर्मचाऱ्यांनी भविष्याच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
मंडळाच्या बैठकीत तब्बल 25 प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात आली. नोंदणीचे 20 प्रकारणास मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या सुरुवातीस राज्य व मुख्य कार्यालयाच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. यावेळी काही जिल्ह्यात जागा न मिळाल्या मुळे कार्यालय सुरू करण्यास विलंब होत असल्याची बाब समजली. यावर अध्यक्षांनी अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यालय शोधून फर्निचर व इतर सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. मागिल बैठकीतील प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. तसेच वक्फचे कामकाज शासनाच्या धर्तीवर गतिशील प्रशासन करण्यावर भर दिला जावा असे अध्यक्षांनी नमूद केले.
यावेळी सदस्य आमदार फारूक शाह, मौलाना अथर अली, मुदसीर लांबे, हसनैन शाकिर, ऍड.इफतेखार हाश्मी,ऍड.एयु पठाण, मुख्यकार्यकारी अधिकारी जुनेद सय्यद, उपमुख्यकार्यकारी अधिकारी मुशीर अहमद शेख व वरिष्ठ अधिकारी खुसरो पठाण ,शारेख काझी उपस्थित होते.
What's Your Reaction?