हर्सुलमधील धार्मिक स्थळांना नोटीस, महापालिकेने दिली 7 दिवसांची मुदत...

हर्सूलमधील धार्मिक स्थळांना नोटीस, महापालिकेने दिली 7 दिवसांची मुदत...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.29(डि-24 न्यूज) - हर्सूल टी पॉइंट ते सावंगी मनपा हद्दीपर्यंतचा रस्ता 60 मीटर रुंद करण्यात बाधित होणाऱ्या धार्मिकस्थळे मंदीर, मस्जिद, कब्रस्तान, भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा आदीं 7 दिवसांत स्वत:हून काढून घ्या, अशी नोटिस महापालिकेच्या झोन क्र.4 च्या सहाय्यक आयुक्तांनी मंगळवारी बजावली आहे.
या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी महापालिकेने मागील आठवड्यात मार्किंग केली आहे. बाधित ठरणाऱ्या मालमत्ता काढून घेण्याबाबत आवाहनही केले आहे. नागरिकांनी बांधकाम स्वत:हून काढून घेतले आहे. तर काही जणांकडून न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. रस्त्यात बाधित होणारी धार्मिकस्थळे स्वत:हून काढून घेण्यासाठी यापूर्वी 15 दिवसांची मुदत दिली होती. परंतू अद्यापही सदर बांधकाम काढून घेण्यात आले नाही. त्यामुळे आता 7 दिवसांची अंतिम मुदत देण्यात येत आहे, दिलेल्या मुदतीत स्वत:हून बांधकाम काढून न घेतल्यास महापालिकेच्या वतीने हे बांधकाम हटविण्याची कार्यवाही करण्यात येईल, अशा आशयाची नोटिस हर्सूल हनुमान मंदीर ट्रस्टचे अध्यक्ष रायाजी नाथाजी औताडे, उपाध्यक्ष पुणम बमणे , फुलेनगरातील कब्रस्थानचे अध्यक्ष फारुख पटेल, जामा मस्जिद, दर्गा छोटी मस्जिदचे अध्यक्ष युनुस पटेल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा समितीचे अध्यक्ष मनोज जाधव यांच्यासह इतरांना देण्यात आली आहे.
कमीटी व संस्थानच्या अध्यक्षांनी महापालिका प्रशासनाने अगोदर बैठक घेऊन पुढील निर्णय घेणार असल्याचे आयुक्तांनी बैठकीत दिला होता परंतु नोटीस मिळाल्याने धक्का बसला. मनपाने धार्मिक स्थळांना पर्यायी जागा द्यावी, जागेचा मोबदला द्यावा नसता धार्मिक स्थळांच्या बाजूने रस्ता काढावा. मनपाला धार्मिक स्थळांना धक्का लावू देणार नाही. रस्ता रुंदीकरणाला आमचा विरोध नाही प्रशासनाने अगोदर बैठक घ्यावी, गावक-यांशी धार्मिक स्थळाबाबत चर्चा करावी त्यानंतर कार्यवाई करावी अशी प्रतिक्रीया त्यांनी दिली आहे. येथील मालमत्ताधारकांची मागणी आहे टिडीआर नको जागेचा मोबदला द्यावा. अतिक्रमण हटवण्याच्या कार्यवाही बाबत हर्सुल पोलिस ठाण्यात उद्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
What's Your Reaction?






