शहरात होणार भव्य डिजिटल मिडीया परिषदेचे अधिवेशन...

शहरात होणार डिजिटल मिडिया परिषदेचे अधिवेशन...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.6(डि-24 न्यूज) -
महाराष्ट्र राज्यातील
युट्यूब चैनल, वेब पोर्टल चालविणा-या पत्रकारांसाठी "डिजिटल मिडिया परिषदे" च्यावतीने संभाजीनगर येथे 14 सप्टेंबर रोजी राज्यव्यापी अधिवेशन होत आहे..
उस्मानपुरा येथील संत एकनाथ रंगमंदिरात हा सोहळा संपन्न होणार आहे. शहराच्या मध्यवर्ती आणि अत्याधुनिक सोयींनीयुक्त असे हे सभागृह आहे. 800 आसन क्षमता असलेले हे सभागृह तुडूंब भरेल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
शरद पाबळे, गणेश मोकाशी, सुरेश नाईकवाडे, अनिल वाघमारे, बालाजी सूर्यवंशी हे परिषद पदाधिकारी तसेच स्थानिक पदाधिकाऱ्यांसह त्यांनी आज सभागृहाची पाहणी केली.
कार्यक्रम जोरदार आणि अविस्मरणीय होणार आहे.
डिजिटलच्या क्षेत्रात समाजाभिमुख पत्रकारिता करणा-या काही संपादकांचा अधिवेशनात सत्कार करण्यात येणार आहे. तसेच अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेची एक विंग असलेल्या डिजिटल मिडिया परिषदेची राज्य कार्यकारिणी निवडली जाणार आहे. डिजिटल मिडियातील पत्रकारांचे हे देशातील पहिलेच अधिवेशन आहे.
बालाजी सूर्यवंशी आणि त्यांच्या टीमशी तयारी संदर्भातही चर्चा केली. तयारी जोरात सुरू असून डिजिटल मिडिया क्षेत्रात कार्यरत असलेले पत्रकार मोठ्या संख्येने अधिवेशनासाठी उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे.
अधिवेशनात डिजिटल मिडिया क्षेत्रातील तज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे
सदर अधिवेशन मध्ये येवून लाभ घेण्यात यावा असे डिजिटल मिडियाचे आयोजक यांनी माहिती दिली आहे.
What's Your Reaction?






