छायाचित्र प्रदर्शनातून आणिबाणी तील घटनांचा इतिहास पाहण्यास मिळणार - संभाजीराव अडकूने

छायाचित्र प्रदर्शनातून आणीबाणीतील घटनाचा
इतिहास पाहण्यास मिळणार : अपर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकूने
• जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने आणीबाणीतील सचित्र प्रदर्शनाचे आयोजन
• नागरिक व अभ्यागताचा छायाचित्र प्रदर्शनास उर्त्स्फूत प्रतिसाद
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. 30 (डि-24 न्यूज) देशात 25 जून 1975 रोजी आणिबाणी लागू करण्यात आली होती. या घटनेला 25 जून रोजी 50 वर्ष पूर्ण झाली आहेत. या काळात ज्या नागरिकांनी तुरुंगवास भोगला व भुमिगत राहून कार्य केले अशा नागरिकांचा इतिहास छायाचित्र व माहितीच्या स्वरुपात या प्रदर्शनाच्या माध्यमातून पाहण्यास मिळत आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून आणिबाणीतील सर्व घटनाक्रम व इतिहास नागरिकांना विविध वर्तमानपत्रातून आलेल्या बातम्या आणि छायाचित्राच्या माध्यमातून अनुभवण्यास मिळत आहे, असे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकूने यांनी केले.
जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने आणीबाणीच्या कालावधीतील छायाचित्र व माहिती प्रदर्शनाचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले, आहे. या प्रदर्शनाचे फित कापून अपर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकूने यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले. यावेळी सामान्य प्रशासन विभागाच्या उपजिल्हाधिकारी संगीता राठोड, भूसंपादन विभागाचे उपजिल्हाधिकारी एकनाथ बंगाळे, माहिती अधिकारी डॉ. मीरा ढास, छायाचित्रकार अनिल परदेशी, तसेच अभ्यागत नागरिकांची उपस्थिती होती.
आपला देश हा लोकशाही पुरस्कृत देश आहे. 1975 ला देशात आणीबाणी लागली यावेळी अनेक नागरिकांना तुरुंगास भोगावा लागला. लोकशाहीचे महत्त्व अधोरेखीत राखण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत. अनेकांनी भुमिगत राहून कार्य केली. या सर्व सहभागी नागरिकांना शासनातर्फे मानधन देण्यात येते. या आणीबाणीत सहभाग घेतलेल्या व्यक्तींप्रती अपर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकूने यांनी कृतज्ञता व्यक्त केली. मराठवाड्यासारख्या दैनिकातून आणीबाणी संदर्भातील असलेल्या विविध घटनांचा वृत्तांत व त्या आठवणी या प्रदर्शनाच्या माध्यमातून जागृत होत आहेत. असे सांगितले
जिल्हाधिकारी कार्यालयात च्या प्रवेशद्वाराजवळ हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असून नागरिकांनी या प्रदर्शनास भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने करण्यात येत आहे.
What's Your Reaction?






