"सेव्ह अ लाईफ" उपक्रमाने 3 हजार हुन अधिक नागरीकांना दिला जीवन वाचवण्याचा मंत्र...

“सेव्ह अ लाइफ” उपक्रमाने 3 हजार हून अधिक नागरिकांना दिला जीवन वाचविण्याचा मंत्र...
महानगरपालिका व कमालनयन बजाज हॉस्पिटलचा संयुक्त उपक्रम...
छत्रपती संभाजिनगर (औरंगाबाद) दि.30(डि-24 न्यूज)
आपत्कालीन परिस्थितीत सामान्य नागरिकही जीवन वाचवू शकतो, हे सिद्ध करणारा एक अभिनव उपक्रम
यशस्वीपणे राबविण्यात आला आहे. महानगरपालिका व एम.एम.आर.आय. ट्रस्टच्या
कमालनयन बजाज हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने " सेव्ह अ लाइफ - बेसिक लाईफ सपोर्ट (BLS) " प्रशिक्षण
मोहीम शहरातील 10 झोनमध्ये मोठ्या उत्साहात पार पडली.
हा उपक्रम आदरणीय आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत सर यांच्या दूरदृष्टीने व वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.पारस
मंडलेचा यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कमलनयन बजाज हास्पिटलचे डॉ.जॉर्ज नोएल फर्नांडिस (सी.ई.ओ),
डॉ.अजय वसंत रोटे(वैद्यकीय संचालक) आणि वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ.मिलिंद वैष्णव यांच्या नेतृत्वाखाली
राबवण्यात आला.
दोन आठवड्यांहून अधिक काळ चाललेल्या या विशेष प्रशिक्षण मोहीमेत शहरातील 10 झोन मधील 3 हजार
हून अधिक महापालिकेचे कर्मचारी आशा वर्कस व सर्वसामान्य नागरिक यांना प्रत्यक्ष कृतीसह प्राथमिक जीवनरक्षक
कौशल्यांचे प्रशिक्षण देण्यात आले. CPR, चोकिंगच्या वेळेचे व्यवस्थापन, रीकव्हरी पोझिशन, कार्डिअॅक अरेस्टची
प्राथमिक मदत अशा जीवन वाचविणाऱ्या कृतींचा समावेश या प्रशिक्षणात होता. प्रशिक्षक
म्हणून डॉ.अभिजीत,डॉ.श्रीकांत अंकुश, कृष्णा आणि कमालनयन बजाज हॉस्पिटलची तज्ञ टीम यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. या उपक्रमाद्वारे थेट 3 हजार पेक्षा जास्त जणांना प्रशिक्षण देण्यात आले, तर अप्रत्यक्षपणे 25 हजार हून अधिक नागरिकांपर्यंत या माहितीचा प्रसार झाला आहे. प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून आणि संवादात्मक प्रशिक्षणामुळे
सहभागींच्या आत्मविश्वासात लक्षणीय वाढ झाली.
“जीवन वाचवणे ही केवळ डॉक्टरांची जबाबदारी नसून, समाजातील प्रत्येक व्यक्तीला याचे भान असावे, हा मुख्य
उद्देश आहे.”
What's Your Reaction?






