शेख शफीक यांची राष्ट्रवादीच्या प्रवक्ते पदी नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या जिल्हा प्रवक्ता पदी शेख शफीक यांची नियुक्ती
छत्रपती संभाजिनगर (औरंगाबाद), दि.30(डि-24 न्यूज) आज रोजी पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा संसदरत्न खासदार सुप्रिया ताई सुळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जिल्हा प्रवक्ते पदी शफीक शेख यांची नियुक्ती जिल्हाध्यक्ष श्री पांडुरंग पाटील तांगडे यांनी केली आहे.
या प्रसंगी प्रदेश सरचिटणीस प्राचार्य सलीम शेख, राजेश पवार, शहर कार्याध्यक्ष आशिष पवार, तसेच मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
या निवडीबद्दल माजी आमदार तथा जिल्हा निरीक्षक चंद्रकांत दानवे, प्रदेश उपाध्यक्ष इलियास किरमाणी, सूधाकर भाऊ दानवे यांनी शेख शफीक यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
What's Your Reaction?






