चिकलठाणा ते एपिआय काॅर्नर 645 अतिक्रमण जमिनदोस्त, उद्या पैठण रोडवर कार्यवाई...

 0
चिकलठाणा ते एपिआय काॅर्नर 645 अतिक्रमण जमिनदोस्त, उद्या पैठण रोडवर कार्यवाई...

चिकलठाणा गाव ते एपीआय कॅार्नर दरम्यान एकूण 645 अतिक्रमण जमीनदोस्त

छत्रपती संभाजिनगर (औरंगाबाद), दि.29(डि-24 न्यूज) प्रशासक श्री.जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त श्री.संतोष वाहुळे यांच्या उपस्थितीत चिकलठाणा गाव ते एपीआय कॅार्नर दरम्यान केलेल्या कारवाईत एकूण 645 एवढी पक्की आणि कच्ची बांधकामे ज्यामध्ये हॅाटेल, लॅाज, दुकाने, शेड, कंपाऊंड, ओटे, गॅरेज,वॅाशिंग सेंटर, कमान, जाहिरात फलक, इ. निष्कासित करण्यात आले आहेत.

सदर कारवाई मध्ये महानगरपालिकेच्या 350 अधिकारी व कर्मचाऱ्यांचा तर पोलीस विभागाचे 400 अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

या कारवाईसाठी 20 जेसीबी, 5 पोकलॅन, 15 टिप्पर, 2 रूग्णवाहिका, 2 कोंडवाडा वाहने, 2 अग्निशमन बंब, 4 इलेक्ट्रिक हायड्रॅालीक वाहने इ. वाहनांचा समावेश होता.

सदरील कारवाई मध्ये नगररचना विभागाचे उप संचालक श्री.गर्जे, यांञिकी विभागाचे श्री.अमोल कुलकर्णी पोलीस उपायुक्त श्री प्रशांत स्वामी, सहायक पोलीस आयुक्त श्री रणजीत पाटील अतिक्रमण उपायुक्त सविता सोनवणे, सहाय्यक आयुक्त अर्जून गिराम, प्राजक्ता वंजारी, अर्चना राजपूत, रमेश मोरे, संजय सुरडकर, गिरी, समीउल्लाह,भारत बिरारे, राहूल जाधव, नईम अन्सारी 

इमारत निरीक्षक कुणाल भोसले, शिवम घोडके,सागर श्रेष्ठ, तृप्ती जाधव, मजहर अली, सय्यद जमशेद, नगररचना विभागाचे सौरभ साळवे, सूरज संवडकर, राहूल व नागरी मित्र पथकाचे प्रमोद जाधव हे कर्मचारी उपस्थित होते.

जालना रोडवरील विनापरवानगी महाकाय होर्डिंग उभारणा-या २ इसमांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

 उद्या पैठण रोडवर कारवाई...

आशा प्रकारची कारवाई सुरूच राहणार असून अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई उद्या दि 30 जून सोमवार रोजी पैठण रोडवर हाती घेण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्य लेखा व वित्तीय अधिकारी तथा नियंत्रण अधिकारी अतिक्रमण विभाग संतोष वाहूळे यांनी दिली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow