दामिनी पथकाकडून विद्यार्थ्यांना सुरक्षितता व जनजागृतीचे मार्गदर्शन

 0
दामिनी पथकाकडून विद्यार्थ्यांना सुरक्षितता व जनजागृतीचे मार्गदर्शन

दामिनी पथकाकडून विद्यार्थ्यांना सुरक्षितता व जनजागृतीचे मार्गदर्शन

छत्रपती संभाजीनगर, दि. 24 (डि-24 न्यूज) – पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील दामिनी पथक-3 तर्फे शुक्रवारी (दि. 24) नूतन माध्यमिक मनपा शाळा, ज्युबिली पार्क येथे विद्यार्थ्यांसाठी जनजागृती व मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

हा कार्यक्रम भरोसा सेलच्या पोलिस निरीक्षक सुनिता मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक तुपेकर यांनी दामिनी पथकाचे स्वागत करून विद्यार्थ्यांना विविध सामाजिक व सुरक्षा विषयांवर मार्गदर्शन करण्याची विनंती केली.

शाळेच्या प्रार्थनेनंतर सुमारे 150 ते 200 विद्यार्थ्यांना ‘गुड टच–बॅड टच’, मोबाईलच्या अतिवापरामुळे होणारे दुष्परिणाम, मुलींनी छेडछाडीच्या प्रसंगी घ्यावयाची काळजी, व्यसनाधीनतेचे दुष्परिणाम, वाहतूक नियमांचे पालन, पोलीस प्रशासनाचे कार्य, तसेच बालविवाह प्रतिबंध व जनजागृती आदी महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

या कार्यक्रमास महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल निर्मला निंभोरे, महिला पोलीस अंमलदार अनिता खैरे, महिला पोलीस अंमलदार अयोध्या दौंड तसेच पोलीस अंमलदार बाळू वणे उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापक तुपेकर, शाळेतील सर्व शिक्षकवृंद यांनी दामिनी पथक व पोलीस प्रशासनाचे आभार मानले. कार्यक्रम शांततापूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार

पडला.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow