आधार विना विद्यार्थी, वाढलेली पटसंख्या व दर्जा वाढीच्या शाळांतील शिक्षकांना समायोजनातून वगळण्याची मागणी

 0
आधार विना विद्यार्थी, वाढलेली पटसंख्या व दर्जा वाढीच्या शाळांतील शिक्षकांना समायोजनातून वगळण्याची मागणी

आधारविना विद्यार्थी, वाढलेली पटसंख्या व दर्जावाढीच्या शाळांतील शिक्षकांना समायोजनातून वगळण्याची मागणी...

जि.प. अध्यक्ष अविनाश पाटील गलांडे यांना शिक्षक भारतीचे निवेदन...

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद),दि.24(डि-24 न्यूज)- जिल्ह्यात सुरू असलेल्या शिक्षक समायोजन प्रक्रियेत आधार कार्ड नसलेले विद्यार्थी, वाढलेली पटसंख्या व दर्जावाढ मिळालेल्या शाळांचा विचार न झाल्याने अनेक शिक्षकांवर अन्याय होत असल्याचा मुद्दा शिक्षक भारतीने उपस्थित केला आहे. यासंदर्भात जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश पाटील गलांडे यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, एप्रिल महिन्यात आधार नसलेल्या विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष शिरगणती करून त्याचा अहवाल जिल्हा परिषदेला सादर करण्यात आला होता. मात्र, संचमान्यता करताना या विद्यार्थ्यांचा विचार न केल्याने अनेक शिक्षक अतिरिक्त ठरत आहेत. तसेच वाढलेली पटसंख्या आणि दर्जावाढ मिळालेल्या शाळांचाही विचार समायोजनात झालेला नाही.

त्यामुळे आधारविना विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष संख्या, वाढलेली पटसंख्या व दर्जावाढ मिळालेल्या शाळांचा विचार करून संबंधित शिक्षकांना समायोजनातून वगळण्यात यावे, अशी मागणी शिक्षक भारतीने केली आहे.

यावेळी जि.प. अध्यक्ष अविनाश पाटील गलांडे यांनी निवेदनाची दखल घेत संबंधित प्रशासनाशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. या प्रसंगी शिक्षक भारती महेंद्र बारवाल, विनोद पवार, दिनेश दाभाड़े, तत्त्व बागुल, रविंद्र बीरारे, दीपक पाटिल, सुरज जाधाव, प्रदीप लवांदे उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow