मनपाचे मुर्तीदान संकलन केंद्रावर 41 हजार 482 गणेशमूर्तीचे दान व विसर्जन
मनपाचे मुर्तीदान संकलन केंद्रांवर 41 हजार 482 गणेशमूर्तींचे दान व विसर्जन
महापालिकेच्या सूक्ष्म नियोजन, गणेश विसर्जन सुरळीत आणि शांततेत संपन्न
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि. 26(डि-24 न्यूज)- गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने शहरात उभारण्यात आलेल्या एकूण 47 मूर्तीदान संकलन केंद्र येथे गणेशमूर्तींचे दान व विसर्जन करण्यात आले. महानगरपालिका आयुक्त श्री. अमोल येडगे यांच्या निर्देशानुसार विसर्जनस्थळी प्रकाश व्यवस्था, मनुष्यबळ, सुरक्षा व्यवस्था, स्वच्छता तसेच आवश्यक सुविधा यांचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले होते. त्यामुळे गणेश विसर्जन सोहळा शांततेत, सुरक्षित आणि सुरळीतपणे पार पडला.
दिनांक 25 सप्टेंबर रोजी झालेल्या विसर्जनादरम्यान महानगरपालिकेच्या मूर्तीदान केंद्र येथे एकूण 41 हजार 482 गणेशमूर्तींचे दान व विसर्जन करण्यात आले. यामध्ये 18 हजार 358 गणेशमूर्तींचे दान, तर 23 हजार 124 गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले.
महानगरपालिका अधिकारी-कर्मचारी संघटनेच्या वतीने टप्पा क्रमांक 3 येथील गणेशमूर्ती संकलन केंद्रावर गणेशमूर्तीची स्थापना करण्यात आली होती. या मूर्तीचे विसर्जन न करता पर्यावरणपूरक पद्धतीने दान करण्यात आले.
गणेशमूर्तींचे विसर्जन न करता जास्तीत जास्त मूर्तीदान करावे, जेणेकरून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करता येईल, असे आवाहन आयुक्त अमोल येडगे यांनी केले होते. त्यांच्या आवाहनाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत 18 हजार 358 गणेशमूर्ती दान केल्या. या मूर्ती पुनर्वापरासाठी मूर्तिकारांना देण्यात येणार आहेत.
महापालिकेच्या अधिकारी-कर्मचारी वर्गाने केलेले नियोजन, गणेश मंडळांनी केलेले सहकार्य आणि नागरिकांनी दाखविलेली पर्यावरणपूरक भूमिका यामुळे यंदाचा गणेशोत्सव सुरळीत, शांततेत आणि पर्यावरणपूरक पद्धतीने संपन्न झाला. याबद्दल आयुक्त अमोल येडगे यांनी महानगरपालिकेचे सर्व अधिकारी-कर्मचारी, गणेश मंडळांचे पदाधिकारी तसेच शहरातील नागरिकांचे अभिनंदन व आभार व्यक्त
केले.
What's Your Reaction?