64 टन निर्माल्याचे संकलन, शास्त्रोक्त प्रक्रीयेतून होणार सेंद्रीय खत निर्मिती
64 टन निर्माल्याचे संकलन; शास्त्रोक्त प्रक्रियेतून होणार सेंद्रिय खत निर्मिती...
विसर्जनानंतर मध्यरात्रीपासून शहर स्वच्छतेची मोहीम; सफाई कर्मचाऱ्यांची रात्रभर धडपड...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.26(डि-24 न्यूज)- गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने निर्माल्य संकलन आणि त्याच्या शास्त्रोक्त व्यवस्थापनासाठी प्रभावी नियोजन केले होते. विसर्जन विहिरी आणि कृत्रिम तलावांच्या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या निर्माल्य कलशांमध्ये नागरिकांनी जमा केलेले निर्माल्य संकलित करून थेट हर्सूल येथील कचरा प्रक्रिया केंद्रावर पाठविण्यात आले. दिवसभरात तब्बल 64 टन निर्माल्य संकलित करण्यात आले असून, नारळ व इतर साहित्याचे सुमारे चार टन संकलन करण्यात आले. महापालिकेने शहरातील विविध विसर्जनस्थळांवर 50 निर्माल्य कलशांची व्यवस्था केली होती. नागरिकांनी निर्माल्य कलशातच निर्माल्य जमा करावे, तसेच प्लास्टिक व नारळ स्वतंत्रपणे द्यावे, याबाबत जनजागृती करण्यात आली. संकलित निर्माल्य ट्रॅक्टर-ट्रॉलीद्वारे हर्सूल येथील कचरा प्रक्रिया केंद्रावर नेण्यात आले.या निर्माल्यावर सुमारे 40 दिवस प्रक्रिया करून त्यापासून सेंद्रिय खत तयार करण्यात येणार आहे. निर्माल्याचे शास्त्रोक्त पद्धतीने व्यवस्थापन करून त्याचे खतामध्ये रूपांतर करण्याच्या माध्यमातून कचऱ्याचा पुनर्वापर आणि पर्यावरण संवर्धनाला चालना देण्यात येत असल्याची माहिती उपायुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख श्री. नंदकिशोर भोंबे यांनी दिली.
गणेशमूर्ती संकलन केंद्रे...
महापालिकेने शहरात विविध ठिकाणी गणेशमूर्ती संकलन केंद्रे उभारली होती. या केंद्रांवर गणेशमूर्ती आणून देणाऱ्या गणेशभक्तांना प्रोत्साहन म्हणून प्रत्येकी एक किलो खताची बॅग देण्यात आली. यासाठी तब्बल 5 हजार खताच्या बॅगची व्यवस्था करण्यात आली होती. नागरिकांनी दिलेल्या गणेशमूर्तींचे योग्य पद्धतीने संकलन करून पर्यावरणपूरक विसर्जन व्यवस्थेला हातभार लावण्यात आला.
विसर्जनानंतर मध्यरात्रीपासून शहर स्वच्छतेची.... मोहीमगणरायाला निरोप देत विसर्जन मिरवणुका संपल्यानंतर महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी मध्यरात्रीपासूनच शहरातील विसर्जनस्थळांची स्वच्छता हाती घेतली. रात्री दोन वाजल्यापासून सुरू झालेल्या स्वच्छता मोहिमेत विसर्जन विहिरी, कृत्रिम तलाव आणि परिसराची युद्धपातळीवर स्वच्छता करण्यात आली. पहाटेपर्यंत बहुतांश विसर्जनस्थळे स्वच्छ करून परिसर पूर्ववत करण्यात आला.जिल्हा परिषद मैदान, एन-12 हडको, शिवाजीनगर, हर्सूल स्मृतिवन कृत्रिम तलाव, राजीव गांधी मैदान एन-५, कांचनवाडी कृत्रिम तलाव, मुकुंदवाडी व संजयनगर विसर्जन विहीर, सातारा परिसर, देवळाई तलाव, ज्योतीनगर कृत्रिम तलाव यासह शहरातील विविध विसर्जनस्थळांची स्वच्छता करण्यात आली.‘विसर्जन संपले, आता स्वच्छतेची जबाबदारी आपली’ या भावनेने सफाई कर्मचाऱ्यांनी रात्री उशिरापर्यंत काम करत विसर्जनस्थळांवरील निर्माल्य, कचरा आणि इतर साहित्य संकलित केले.
कागद, चमकी याचा वापर बंद करावा...
यावर्षीच्या गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान असे निदर्शनास आले की, हाय प्रेशर मशीनद्वारे कागदाचे तुकडे, चमकी व इतर सजावटीचे साहित्य हवेत उडविण्यात आल्यामुळे मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण झाला. परिणामी विसर्जन मिरवणुकीचा मार्ग व परिसर अस्वच्छ झाला.या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका, घनकचरा व्यवस्थापन विभाग यांच्यामार्फत सर्व गणेश मंडळे, आयोजक व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, मिरवणुकीदरम्यान कागद, चमकी किंवा इतर कचरा निर्माण करणारे साहित्य हाय प्रेशरद्वारे उडविण्याचा वापर टाळावा.
महापौर, आयुक्तांकडून सफाई कर्मचाऱ्यांचे कौतुक...
सफाई कर्मचाऱ्यांच्या तत्पर आणि अथक सेवाभावाची दखल घेत महापौर श्री. समीर राजूरकर आणि महापालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. अमोल येडगे यांनी कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. उपायुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख श्री. नंदकिशोर भोंबे यांनीही सफाई कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत गणेशमूर्ती संकलन, विसर्जन व्यवस्था आणि निर्माल्य संकलनाची जबाबदारी महापालिका कर्मचाऱ्यांनी प्रभावीपणे पार पाडली. विसर्जनानंतरही तातडीने स्वच्छता करून शहर स्वच्छ ठेवण्याचे काम करण्यात आले.निर्माल्याचे शास्त्रोक्त व्यवस्थापन, त्यातून खतनिर्मिती आणि विसर्जनानंतर तातडीने करण्यात आलेली स्वच्छता यामुळे ‘गणरायाला निरोप आणि शहराला स्वच्छतेची पहाट’ असा स्वच्छतेचा संदेश छत्रपती संभाजीनगरा
तून देण्यात आला.
What's Your Reaction?