वक्फ बोर्ड सुनावणीत राडा, पुण्याचे सलिम मुल्लांची पोलिस ठाण्यात तक्रार...

वक्फ बोर्ड सुनावणीत राडा, पुण्याचे सलिम मुल्लाची पोलिस ठाण्यात तक्रार...
चेअरमन समीर काझी यांना या वादावर विचारले असता त्यांनी बोलण्यास नकार दिला, उद्या पत्रकार परिषदेत बैठकीची माहीती देण्यात येईल असे सांगितले.
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.24(डि-24 न्यूज) -
दरमहीन्याला महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाची नियमित सुनावणी व बैठक घेण्याचे चेअरमन समीर काझी यांनी निर्णय घेतला. या पहिल्याच बैठकीदरम्यान प्रवेशद्वारावर राडा झाल्याने खळबळ उडाली. यामुळे पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.
हज हाऊस येथे सकाळपासून राज्यातील प्रकरणांची सुनावणी सुरु आहे. दुपारनंतर आत सुनावणी सुरु असताना पुण्याहुन एका प्रकरणात महाराष्ट्र वक्फ लिबरेशन एण्ड प्रोटेक्शन टास्क फोर्सचे संस्थापक अध्यक्ष सलिम मुल्ला सुनावणीसाठी हजर झाले होते. प्रवेशद्वारावरुन आत जाण्यासाठी आले असता त्यांच्याशी अज्ञातांनी वाद घातला. तोंडावर चापट मारली असता नाकातून रक्त निघाले. यानंतर बंदोबस्तावर तैनात पोलिसांनी वाद मिटवला. यानंतर खळबळ उडाली. चेअरमन समीर काझी यांनी त्यांना आत बोलावले व घटनेचा तपशील घेतला. अज्ञातांविरुध्द बेगमपुरा पोलिस ठाण्यात सलिम मुल्ला यांनी तक्रार दिली आहे. वक्फ बोर्ड सुध्दा वाद घालणा-यांवर कायदेशीर कार्यवाही करणार असल्याची माहीती सुत्रांनी दिली आहे. या ना त्या वादांमुळे वक्फ बोर्ड चर्चेत असते परंतु वक्फ मालमत्ता वाचवण्यासाठी नेहमी योगदान देणारे सलिम मुल्ला यांना मारहाण झाल्याने संतप्त प्रतिक्रीया येत आहे.
What's Your Reaction?






