वेरुळ रस्त्यावर 500 अतिक्रमण, व्यवसायिक स्वतः काढून घेत आहे अतिक्रमण...

वेरुळ रस्त्यावर 500 अतिक्रमण, व्यवसायिक स्वतः काढत आहे अतिक्रमण
वेरुळ, दि.24(डि-24 न्यूज) - वेरुळ लेणी व श्री घृष्णेश्वर मंदीर परिसरातील रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्यास प्रशासनाने हालचाली सुरु केले आहे. काही व्यवसायिकांनी स्वतः अतिक्रमण काढण्यास सुरु केले आहे. दौलताबाद रस्त्यावरील काही मालमत्ताधारकांनी स्वतः आपल्या हाताने अतिक्रमण काढण्यास सुरु केले आहे. सा.बा.विभागाचे अभियंता एस के चव्हान यांनी रस्त्याचे मोजमाप करुन 50 फुट रस्त्यावर मार्कींग करण्यात आली आहे. दौलताबाद येथील नागरीकांनी रस्ता रुंदीकरणास विरोध केला आहे. ग्रामपंचायत सदस्यांनी ठरावाची प्रत व निवेदन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांना सादर करुन मागणी केली आहे.
धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमण काढण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. छोटे व्यापारी आणि टपरी चालकांनी स्वखुशीने आपली दुकाने काढण्यास सुरु केले आहे. तहसिलदार स्वरुप कंकाळ यांनी डि-24 न्यूजशी बोलताना सांगितले मार्कींगचे काम पुर्ण होताच अतिक्रमणाची कार्यवाही सुरु करणार आहे. यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येईल. प्रशासनाच्या वतीने अंतीम तयारी सुरु आहे. 3 ते 4 दिवसांत कार्यवाई होण्याची शक्यता आहे. परिसरातील दुकानदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. वेरुळ लेणी परिसर धार्मिक, ऐतेहासिक व पर्यटनस्थळ असल्याने महत्वाचे आहे म्हणून अतिक्रमण मुक्ती व्हावी असे पर्यटकांचे म्हणने आहे. हि काळाची गरज आहे. हे अतिक्रमण निघाल्यावर पुढे गायरान व शासकीय जमीनीवरील अतिक्रमण लवकरात लवकर काढण्यात येईल. कुंभमेळ्यापूर्वी सर्व रस्ते मोकळे करण्यात येतील. असे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे. खुलताबाद तालूक्यातील शुलीभंजन पर्यंत लेखी नोटीसा देण्यात आले. वेरुळ शिवारात मार्कींग करुन तोंडी सूचना दिले आहे. संबंधितांनी तीन दिवसांत अतिक्रमण काढून घ्यावे अन्यथा कार्यवाही केली जाईल. म्हणून स्वतः व्यवसायिक अतिक्रमण काढून घेत आहे. या रस्त्यावर हाॅटेल्स व दुकाने आहेत. प्रशासनाने पुनर्विचार करावा. पोटापाण्याचा प्रश्न निर्माण होईल अशी मागणी येथील रहीवासी करत आहे.
What's Your Reaction?






